AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनिषा उईके आयुष्यात कधीच सुखी होणार नाही, दीपाली चव्हाणांनी पतीला लिहिलेल्या पत्रात ‘ती’ महिला कोण?

दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी पती राजेश मोहिते यांच्या नावे एक भावनिक पत्र लिहिले होते (Deepali Chavan letter Husband Rajesh Mohite)

मनिषा उईके आयुष्यात कधीच सुखी होणार नाही, दीपाली चव्हाणांनी पतीला लिहिलेल्या पत्रात 'ती' महिला कोण?
दीपाली चव्हाण
| Updated on: Mar 28, 2021 | 9:06 AM
Share

अमरावती : वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी (RFO Deepali Chavan Suicide) पतीला लिहिलेल्या एका पत्रामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. “मनिषा उईके तिच्या आयुष्यात कधीच सुखी होणार नाही, तिने माझे आयुष्य बरबाद केले आहे” असा उल्लेख दीपाली चव्हाणांनी पतीला लिहिलेल्या पत्रात आहे. त्यामुळे पत्रात उल्लेख असलेली ‘ती’ महिला कोण? तिचा दीपाली यांच्या आत्महत्येशी काही संबंध आहे का, यासारखे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. (Amravati RFO Deepali Chavan wrote letter to Husband Rajesh Mohite before Suicide mentioned Manisha Uike)

काय आहे पत्रात?

दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी पती राजेश मोहिते यांच्या नावे एक भावनिक पत्र लिहिले होते. त्यात एका महिलेच्या नावाचा उल्लेख केलेला आहे. “मनिषा उईके तिच्या आयुष्यात कधीच सुखी होणार नाही. तिने माझे आयुष्य बरबाद केले आहे ” अशी ओळ दीपाली यांनी लिहिलेली आहे. त्यामुळे आता मनिषा उईके ही कोण आहे? दीपाली चव्हाण यांनी तिचा उल्लेख का केला? तिने माझे आयुष्य बरबाद केले आहे, असे त्यांनी का लिहिले? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरीसाल येथे वनपरिक्षेत्र अधिकारी पदावर दबंग कामगिरी बजावत असलेल्या दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार याच्या जाचाला कंटाळून दीपाली चव्हाण यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. त्यांनी लिहिलेल्या सुसाईट नोटमधून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

डीएफओ विनोद शिवकुमारला नागपुरात बेड्या

डीएफओ विनोद शिवकुमार याच्या जाचाला कंटाळून दीपाली यांनी आत्महत्या केल्याने धारणी पोलिसांनी त्याला नागपुरातून अटक केली. दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवकुमारला धारणी न्यायालयाने शनिवारी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दीपाली चव्हाण यांच्या आईने आरोपी शिवकुमारला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. वनविभागाच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी राज्यभरातून होत आहे. विनोद शिवकुमार याचं निलंबन करुन श्रीनिवास रेड्डी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

दीपाली चव्हाण यांची सुसाईड नोट

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर त्यांची चार पानी सुसाईड नोट सापडली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या नावे ही सुसाईड नोट लिहिण्यात आली आहे. यात वरिष्ठ अधिकारी DFO विनोद शिवकुमार यांनी मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. (Amravati RFO Deepali Chavan wrote letter to Husband Rajesh Mohite before Suicide mentioned Manisha Uike)

फोनवरील वार्तालापाची ऑडिओ क्लीप

दरम्यान, RFO दीपाली चव्हाण आणि डीसीएफ विनोद शिवकुमार यांच्यामध्ये फोन वरुन जे वार्तालाप झालं त्याची कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे. यामध्ये संबंधित अधिकारी आपल्याच वनविभागाच्या महिला अधिकाऱ्यांसोबत कशाप्रकारे एकेरी भाषेत बोलतात. बोलताना मान मर्यादा आणि महिलांशी कसं बोलायचं याचं सुद्धा भान त्यांना उरलेलं दिसत नाही. ही ऑडिओ क्लीप तुम्ही ऐकू शकता

संबंधित बातम्या :

साताऱ्याची दीपाली, मेळघाटात वनअधिकारी, स्वत:वर गोळी झाडली, हादरवणारी सुसाईड नोट जशीच्या तशी

ना भान, ना बोलण्याची तमा, कथित अधिकाऱ्यासोबत दीपाली चव्हाण यांचं संभाषण

शिवकुमारला ताब्यात द्या, महिला आक्रमक, पोलिसांनी आरोपीला साखळी करुन कोर्टात नेलं

(Amravati RFO Deepali Chavan wrote letter to Husband Rajesh Mohite before Suicide mentioned Manisha Uike)

ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.