Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अय्यो! लग्नाआधी महिला पोलीसाची होणाऱ्या नवऱ्यालाच अटक! फियॉन्सीनं फसवलं? प्रकरण इंटरेस्टिंगए

2022 च्या सुरुवातीपासून जोनमणीला पगगवर संशय येऊ लागला होता. स्वतःला ओएनजीसीचा पीआरओ सांगणाऱ्या पगगने कंत्राट देण्याच्या नावाखाली 25 लाख रुपयांची फसवणूक केली.

अय्यो! लग्नाआधी महिला पोलीसाची होणाऱ्या नवऱ्यालाच अटक! फियॉन्सीनं फसवलं? प्रकरण इंटरेस्टिंगए
साखरपुडाही झाला होता..पणImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 9:56 AM

पोलीस अधिकारी (Young lady officer) असलेल्या एका तरुणीनं आपल्याच होणाऱ्या नवऱ्याला अटक (arrest) केली आहे. ही घटना आसामच्या गुवाहाटीमधील आहे. फसवणूक करुन लग्नाच्या जाळ्यात ओढण्याच्या प्रयत्नात असल्याचं लक्षात येताच, पोलीस अधिकारी असलेल्या तरुणीनं ठग असलेल्या तरुणाला बेड्या ठोकल्यात. याप्रकरणी तपास केल्यानंतर (Police investigation) आधी तरुणाला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर या तरुणावर अटकेची कारवाई करण्यात आली. बुधवारी संध्याकाळी कोर्टात आरोपी तरुणाला आणण्यात आलं. या आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आपली ओळख लपवून पोलीस अधिकारी महिलेसोबत लग्नाच्या जाळ्यात ओढण्याचा या तरुणाचा प्लान होता. मात्र त्याआधीच या तरुणाचा भांडाफोड झालाय.

कळलं कसं काय?

हा सगळा धक्कादायक प्रकार नगांव या आसाममधील जिल्ह्यात घडला. जोनमणी राभा ही तरुण पोलीस अधिकारी नगांव ठाण्यात पोस्टींगवर होत्या. आपला होणारा नवरा राणा पगग यांनं फसवणूक करुन लग्नाचा कट रचवून आणल्याची शंका पोलीस अधिकारी तरुणीला होती. त्याअनुशांगानं तिनं तपास केलं. या तपासात या तरुणानं गंडवून आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचंही समोर आलं. त्यामुळे या तरुणाला अटक करण्यात आली आहे. आजतकनं याबाबतचं वृत्त दिलंय.

जानेवारी पहिली भेट…

तरुण महिला पोलीस अधिकारी जोनमणी राभा यांची 2021 मध्ये माजुलीमध्ये पोस्टिंग झाली होती. त्या दरम्यान, पगग हा स्वतःला ओएनजीसीचा पीआरओ म्हणजेच जनसंपर्क अधिकारी असल्याचा दावा करत होता. पुढे जाऊन दोघांचा संपर्क वाढला. पगगने जोनमणी यांना लग्नाची मागणी घातली. जोनमणी या तरुणी पोलीस अधिकारी असलेल्या महिलेनंही लग्नाला होकार दिला. 2 ऑक्टोबर 2021 मध्ये दोघांचा साखरपुडा झाला. 2022 मध्ये लग्न करण्याचं ठरलं होतं. नोव्हेंबर 2022 मध्ये लग्न करण्याचा मुहूर्तही निघाला होता. पण त्याआधीच हे लग्न मोडल्यात जमाय.

हे सुद्धा वाचा

2022 च्या सुरुवातीपासून जोनमणीला पगगवर संशय येऊ लागला होता. स्वतःला ओएनजीसीचा पीआरओ सांगणाऱ्या पगगने कंत्राट देण्याच्या नावाखाली 25 लाख रुपयांची फसवणूक केली. खरंतर जोनमणीनंही पीआर आणि एडव्हरटाईजमेन्टची पदवी घेतलेली आहे. त्यामुळे जोनमणी यांचा संशय वाढत गेला. मग चौकशीला सुरुवात करण्यात आली. त्यात पगग ओएनजीसीमध्ये कामाला नसल्याचं उघडकीस आलं. यानंतर संशय पक्का झाला.

पगग एक एसयूव्ही वापरत होता आणि बॉडीगार्डही त्याने ठेवलेला. पण हे सगळं भाडोत्री होतं, हे चौकशीतून स्पष्ट झालं. यानंतर पगगविरोधात जोनमणीनं कडक कारवाई करत त्याच्या मुसक्या आवळल्यात. पगगवर आता फसवणूक, खोटी कागदपत्र देणं, लोकांकडून पैसे लाटणं, असे आरोप करण्यात आले आहेत. जो चुकीचं कृत्य करेलं, त्याला मी सोडणार नाही, असं या महिला पोलीस अधिकारीनं म्हटलं. भलेही ती व्यक्ती माझ्या कुटुंबातली का असेना, जो कायदा मोडेल, त्याला धडा शिकवेनच, असा निर्धारही या डॅशिंग महिला पोलीस अधिकारीनं बोलून दाखवलंय. आजतकच्या पल्लव कुमार बोरा यांनी याबाबतचं वृत्त दिलं होतं.

पाहा व्हिडीओ :

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.