‘पाणी द्या, मला वाचवा’ ओरडत होती पत्नी, पती मात्र व्हिडिओ बनवण्यात मग्न; नेमके प्रकरण काय?

अंजलीने पतीच्या अनैतिक संबंधांना विरोध केला. यामुळे पतीने सासरच्यांसोबत मिळून पत्नीला जिवंत जाळले. ते इतक्यावरच तिचा छळ थांबला नाही.

'पाणी द्या, मला वाचवा' ओरडत होती पत्नी, पती मात्र व्हिडिओ बनवण्यात मग्न; नेमके प्रकरण काय?
वीजेचा शॉक लागून मायलेकाचा दुर्दैवी मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Oct 01, 2022 | 4:20 PM

बिहार : बिहारमधील बक्सर जिल्ह्यात संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधांना विरोध (Oppose to Immoral Relation) करणाऱ्या पत्नीला पती आणि सासरच्यांनी जिवंत पेटवल्याची (Burn Alive) अंगावर काटा आणणारी घटना बिहारमधील बक्सरमध्ये (Buxar Bihar) घडली आहे. पत्नी जीवाच्या आकांताने ओरडत होती, पाणी मागत होती. मात्र निर्लज्य पती तिचा व्हिडिओ बनवण्यात मग्न होता. हा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे.

पीडित महिलेवर वाराणसीत उपचार सुरु

अंजली राय असे 24 वर्षीय जखमी महिलेचे नाव आहे. जखमी महिलेवर वाराणसी ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. पोलिसांनी महिलेचा सासरा आणि अन्य एका आरोपीला अटक केली आहे. तर पती फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

सासरच्यांकडून आणखी हुंड्याची मागणी होत होती

अंजलीचा 21 नोव्हेंबर 2021 रोजी सुर्यदेव राय याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर सासरचे लोक आणखी पाच लाख रुपये हुंडा माहेरुन आणण्यासाठी महिलेचा छळ करत होते. यानंतर पतीचे आपल्या वहिनीसोबत अनैतिक संबंध सुरु असल्याची माहिती अंजलीला मिळाली.

हे सुद्धा वाचा

पतीच्या अनैतिक संबंधांना विरोध केला म्हणून जाळण्याचा प्रयत्न

अंजलीने पतीच्या अनैतिक संबंधांना विरोध केला. यामुळे पतीने सासरच्यांसोबत मिळून पत्नीला जिवंत जाळले. ते इतक्यावरच तिचा छळ थांबला नाही. महिला त्यांच्याकडे पिण्यासाठी पाणी मागत होती.

मात्र पती आणि सासरचे तिला स्वतःहून आग लावून घेतल्याचे कबुल करण्यास दबाव टाकत होते. घरी कुणी नव्हते, तेव्हा मी स्वतःहून आग लावून घेतली, असे कबुल केले तरच पाणी मिळेल, कबुलीजबाब व्हिडिओमध्ये देण्यास सांगत होते. हा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे.

सासऱ्यासह अन्य एकाला अटक, पती फरार

याप्रकरणी अंजलीच्या नातेवाईकांनी पती, सासरा आणि जावेविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. नातेवाईकांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत सासऱ्यासह अन्य एकाला अटक केली आहे. फरार पतीचा पोलीस शोध घेत आहेत.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.