कॉलेजवरुन आले की दुपारी प्लॅन करायचे, आणि रात्रीच्या वेळी…पोलीसांच्या कारवाईनंतर कॉलेज परिसरात खळबळ, सीसीटीव्हीत तपासताच…

धुळे येथून नाशिक शहरात अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी नाशिकमध्ये केलेल्या गुन्ह्याची महाविद्यालय परिसरात जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

कॉलेजवरुन आले की दुपारी प्लॅन करायचे, आणि रात्रीच्या वेळी...पोलीसांच्या कारवाईनंतर कॉलेज परिसरात खळबळ, सीसीटीव्हीत तपासताच...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 2:00 PM

नाशिक : शिक्षणासाठी शहरात आलेल्या तरुणांनी एकत्र राहत असतांना रिकाम्या वेळेत केलेला पराक्रम सध्या महाविद्यालयीन ( College Student )वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. नाशिकमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी धुळे येथून आलेल्या विद्यार्थ्यांनी फ्लॅटमध्ये राहत असतांना चोरीची योजनाच आखली होती. रहिवाशी इमारतीमधून दुचाकी चोरी ( Bike Theft )  करून ती परस्पर बाहेर विक्री केली जात होती. दुचाकी चोरीच्या ( Nashik Crime ) गुन्ह्याचा तपास करत असताना नाशिक गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली आहे. सीसीटीव्हीची तपासणी करत असतांना चोरीला गेलेली दुचाकी निदर्शनास आल्याने अधिकचा तपास करत तिघांना ताब्यात घेतले आहे.

नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाविकनगर परिसरात ही घटना घडली होती. दुचाकीची पार्किंगमधून चोरी झाल्याची तक्रार संतोष कोरडे यांनी दिली होती.

कोरडे यांच्या तक्रारीवरुन तपास करत असतांना सीसीटीव्हीची तपासणी करत असतांना एक संशयित आढळून आला होता, त्याची चौकशी केल्यानंतर गंगापूर नाका येथे राहत असल्याचे तपासात समोर आले होते.

हे सुद्धा वाचा

सरकारवाडा पोलीसांनी मूळचा साक्री येथील पिंपळनेरचा असलेल्या आयुष राजेश राका याला ताब्यात घेत चौकशी केली होती. त्यामध्ये त्याने दुचाकी करत असल्याची कबुली पोलिसांना दिली होती.

त्यामध्ये आयुष ज्या इमारतीमध्ये राहत होता, त्याच रहिवासी इमारतीच्या पार्किंगमध्ये चोरून आणलेल्या पाच दुचाकी पार्किंग केल्याचीही कबुली दिली आहे. त्यानंतर त्याचे दोन साथीदारही ताब्यात घेतले आहे.

आयुष सोबत चोरी करतांना त्याचे दोन रूममेट त्याला मदत करत होते. कॉलेजवरुन आल्यानंतर रात्रीच्या वेळी ही चोरी करत होते, हे दोन्ही रूममेट अल्पवयीन आहेत.

विशेष म्हणजे बाजारात ज्या दुचाकीला मागणी आहे, त्याच दुचाकी चोरण्याचे काम हे करत होते, पोलीसांच्या तपासात ही बाब समोर आली आहे. चोरलेल्या दुचाकी हे धुळे किंवा साक्री येथे नेऊन विक्री करणार होते.

सरकारवाडा पोलीसांनी केलेल्या तपासात तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये सीसीटीव्ही हा महत्वाचा धागा ठरला आहे. नाशिक शहर पोलीसांनी केलेली ही कारवाई महाविद्यालय परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.

दुचाकी चोरी करणाऱ्या मुख्य संशयित आरोपीचे वडील हे धुळ्यात व्यापारी आहे. त्यामुळे धुळ्यातही या चोरीची घटनेची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.