दोन्ही सख्या भावांनी उचललं टोकाचं पाऊल, एकाचा मृत्यू दुसऱ्याची मृत्यूशी झुंज, सुसाईड नोट सापडल्यानं उडाली खळबळ
कांबळे यांच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी रुग्णालयाच्या बाहेर मोठा गोंधळ घातला आहे. खाजगी सावकाराला अटक करा अशी मागणी करत नातेवाइकांनी पोलिसांसमोरच राडा केला आहे.
नाशिक : नाशिकच्या सातपुर येथे सावकाराच्या (Moneylenders) जाचाला कंटाळून बाप लेकाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना ताजी असतांना नाशिकरोड (Nashik Crime) परिसरात दोन्ही भावांनी विषप्राशन करून जीवन संपविण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर एकाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. नाशिकच्या भालेराव मळ्यात ही घटना घडली आहे. यामध्ये रवींद्र लक्ष्मण कांबळे आणि जगन्नाथ लक्ष्मण कांबळे या दोन्ही भावांनी विषप्राशन केले होते. त्यामध्ये यामध्ये रवींद्र कांबळे यांचा मृत्यू झाला असून जगन्नाथ कांबळे यांची प्रकृती चिंताजनक आहे.
नाशिकरोड येथील सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. यामध्ये मयत रवींद्र कांबळे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे.
रवींद्र कांबळे यांच्या सुसाईडनोटमध्ये आत्महत्या करण्याचे कारण सांगितले आहे. यामध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असून त्याच्यावर शासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कांबळे यांच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी रुग्णालयाच्या बाहेर मोठा गोंधळ घातला आहे. खाजगी सावकाराला अटक करा अशी मागणी करत नातेवाइकांनी पोलिसांसमोरच राडा केला आहे.
नाशिकरोड येथील रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकाच मृत्यू आणि गंभीर असल्याने नातेवाईक चांगलेच आक्रमक झाले असून कारवाईची मागणी करत आहे.
नाशिकरोड येथील खाजगी रुग्णालयात एकावर उपचार सुरू असून शहरात सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची दुसरी घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कांबळे बंधु हे ज्या खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले होते त्याच्याकडेच वसुलीचे काम करीत होते, त्यामध्ये सहा लाख रुपये कर्ज घेतले होते, त्यास 20 टक्के व्याज असल्याचे समोर आले आहे.
कांबळे यांनी दागिने आणि इतर वस्तु विक्री करून तसेच उसनवार पैसे घेऊन सात लाख रुपये सावकाराला दिले होते. त्यामुळे सावकारी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
पोलीस ठाण्यात याबाबत अद्याप गुन्हा दाखल नसला तरी त्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. जबाब घेण्याची प्रक्रिया झाल्यानंतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तर दुसरीकडे सावकारावर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असं म्हणत नातेवाइकांनी नाशिक पुणे महामार्गावर रास्ता रोको केला होता, पोलिसांसमोरच हा राडा करण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.