Silvasa Crime : पैशाच्या हव्यासापोटी 9 वर्षाच्या मुलाचा नरबळी; आधी अपहरण केले मग हत्या

हत्येचा तपास करत पोलीस एका किशोरवयीन आरोपीपर्यंत पोहचले. या मुलाला ताब्यात घेत पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता हत्या प्रकरणाचा खुलासा केला.

Silvasa Crime : पैशाच्या हव्यासापोटी 9 वर्षाच्या मुलाचा नरबळी; आधी अपहरण केले मग हत्या
पैशाच्या हव्यासापोटी 9 वर्षाच्या मुलाचा नरबळीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 10:19 PM

सिलवासा : पैशाच्या हव्यासापोटी एका 9 वर्षाच्या बालकाचे अपहरण करुन नरबळी दिल्याची धक्कादायक घटना दादरा आणि नगर हवेली येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. एका तांत्रिकाच्या सल्ल्यानुसार आरोपींनी नरबळी देण्यासाठी आधी मुलाचे अपहरण केले आणि मग त्याची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे केले. मयत बालक आदिवासी वारली समाजातील होता. आरोपींविरोधात कलम 302, 201 आणि 102बी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त केले आहे.

गुजरातमधील वापीमध्ये सापडला होता मृतदेह

गुजरातमधील वापी शहराजवळ दमनगंगा नाल्यात एका मुलाचा शीर नसलेला मृतदेह सापडला. तर सायली गावात तेथे तंत्रविद्या करण्यात आली होती तिथे मृतदेहाचे काही तुकडे सापडले. सर्व तुकडे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

पोलीस विशेष पथक तयार करुन तपास सुरु केला

मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला. हत्येचा तपास करण्यासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले होते. या पथकावर विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

तपास करता करता पोलीस किशोरवयीन आरोपीपर्यंत पोहचले

हत्येचा तपास करत पोलीस एका किशोरवयीन आरोपीपर्यंत पोहचले. या मुलाला ताब्यात घेत पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता हत्या प्रकरणाचा खुलासा केला.

नरबळीसाठी आधी अपहरण मग हत्या

सायली गावातून पीडित मुलाचे 29 डिसेंबर 2022 रोजी अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर आपल्या साथीदारांच्या मदतीने 30 डिसेंबर 2022 रोजी मुलाची नरबळी देण्यासाठी हत्या केल्याचे आरोपी पोलिसांना सांगितले.

या हत्याकांडात शैलेश कोहकेरा आणि रमेश सांवर यांचाही समावेश असल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी शैलेश आणि रमेशला अटक केली. तर किशोरवयीन आरोपीला सूरतला ऑब्जर्वेशन होममध्ये पाठवण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.