महाविद्यालयीन तरुणाकडून मैत्रिणीची हत्या, एकतर्फी प्रेमातून संपवलं

एकतर्फी प्रेम करणाऱ्या विद्यार्थ्याने कॉलेजमधील विद्यार्थीनीची गळा आवळून हत्या केली (Andhra Pradesh Guntur Murder Of Girl).

महाविद्यालयीन तरुणाकडून मैत्रिणीची हत्या, एकतर्फी प्रेमातून संपवलं
Andhra Pradesh Guntur Murder
Follow us
| Updated on: Feb 25, 2021 | 8:56 AM

हैद्राबाद : एकतर्फी प्रेम करणाऱ्या विद्यार्थ्याने कॉलेजमधील विद्यार्थीनीची गळा आवळून हत्या केली (Andhra Pradesh Guntur Murder Of Girl). आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात ही घटना घडली. नरसारावपेटमध्ये एका खाजगी कॉलेजची विद्यार्थी अनुषाला तिच्याच कॉलेजमधील विष्णुवर्धन रेड्डीने जबरदस्ती आपल्या बाईकवर बसवलं आणि तिला पालपाडू रोडच्या कडेला घेऊन गेला. येथे या दोघांमध्ये वाद झाला. विष्णुवर्धन एकतर्फी प्रेम करत होता. अनुषाला त्याने घाबरवण्याचा प्रयत्न केला. पण, ती ऐकली नाही, तेव्हा त्याने गळा आवळून तिची हत्या केली आणि तिला कालव्यात फेकून तेथून निघून गेला. त्यानंतर त्याने स्वत: पोलिसांसमोर आत्मसपर्पण केलं (Andhra Pradesh Guntur Murder Of Girl).

मिळालेल्या माहितीनुसार, मुप्पाल्ला मंडळाच्या गोल्लपाडु गावात राहणारी अनुषा नरसारावपेट येथील एका कॉलेजमध्ये डिग्री सेकेंड ईअरचं शिक्षण घेत होती आणि बोल्लापल्ली मंडळचे पमिडीपाडु गावातील निवासी विष्णुवर्धन रेड्डी हा देखील त्याच कॉलेजमध्ये शिकत होता. विष्णुवर्धन रेड्डीचं अनुषावर एकतर्फी प्रेम होतं. परंतु, यादरम्यान विष्णुवर्धनला संशय आला की अनुषा गेल्या काही दिवसांपासून दुसऱ्या मुलाच्या प्रेमात पडली आहे.

त्यानंतर विष्णुवर्धन अनुषाला महत्त्वाचं बोलायचं आहे असं सांगून जबरदस्ती सोबत घेऊन गेला आणि दूसऱ्या तरुणासोबतच्या तिच्या नात्याबाबत तिच्याशी भांडण करु लागला. वाद इतका विकोपाला गेला की विष्णुवर्धन रेड्डीने अनुषाची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर मृतदेहाला कालव्यात फेकलं. यानंतर त्याने थेट नरसारावपेट रुरल ठाणे गाठलं आणि आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

मृत विद्यार्तीनीच्या आई-वडिलांनी आरोप केला आहे की प्रेम करत नसल्याने विष्णुवर्धनने अनुषाची निर्घृणपणे हत्या केली. आई-वडिलांनी न्यायाची मागणी करत ते मृतदेहासोबत आंदोलनावर बसले आहेत (Andhra Pradesh Guntur Murder Of Girl).

यादरम्यान, नरसारावपेट शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. विद्यार्थिनी अनुषाच्या हत्येनंतर विरोधात विद्यार्थी, स्थानिक लोक आणि पीडित कुटुंब रस्त्यावर उतरलं आहे. कुटुंब मृतदेहासह पल्नाडु बस स्टँडजवळ धरणे आंदोलनावर बसले आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Andhra Pradesh Guntur Murder Of Girl

संबंधित बातम्या :

धक्कादायक! हातकणंगलेत तरुणाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या

आम्ही राहायचं कुठे? प्रॉपर्टीच्या वाद विकोपाला, मुलाकडून वडिलांची हत्या

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.