Beed Crime : घरगुती वाद टोकाला गेला, पतीने अंगणवाडी सेविकेचा काटा काढला !

बीडमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. पती-पत्नीमधील घरगुती वाद टोकाला गेला आणि भयंकर घटना घडली.

Beed Crime : घरगुती वाद टोकाला गेला, पतीने अंगणवाडी सेविकेचा काटा काढला !
घरगुती वादातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 23, 2023 | 12:40 PM

बीड / 23 ऑगस्ट 2023 : घरगुती वादातून पतीनेच अंगणवाडी सेविकेची हत्या केल्याची खळबळजनक घटना बीडमध्ये घडली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने स्वतःहून पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुंडीराम भोसले असे आरोपी पतीचे नाव आहे. तर मंगल गुंडीराम भोसले असे पीडित पत्नीचे नाव आहे. बीडमधील धावज्याचीवाडी येथे ही घटना घडली. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नेकनूर पोलीस अधिक तपास करत आहेत.

वाद विकोपाला गेला अन् पतीने पत्नीचा काटा काढला

बीड तालुक्यातील धावज्याचीवाडी येथे मंगल भोसले आणि गुंडीराम भोसले पती पत्नी राहत होते. मंगल ही अंगणवाडी सेविका म्हणून काम करत होती. पती-पत्नीमध्ये काही कारणातून नेहमी वाद होत होते. अखेर हा वाद विकोपाला गेला आणि पतीने पत्नीच्या डोक्यात खोऱ्याने वार करुन तिची हत्या केली. गावापासून 500 मीटर अंतरावर असलेल्या जनावरांच्या गोठ्यात ही घटना घडली.

पत्नीच्या हत्येनंतर पतीचे आत्मसमर्पण

पत्नीची हत्या केल्यानंतर पती स्वतःहून नेकनूर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली. पतीच्या माहितीनुसार, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. दरम्यान घटनास्थळाची कसून झाडाझडती घेतली असून, सखोल तपासासाठी फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली होती. दरम्यान, नेकनूर पोलीस ठाण्याचे एपीआय विलास हजारेंसह टिमकडून अधिक तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.