Chandrapur Murder : पत्नीला पळविल्याचा राग, प्रियकराच्या वडिलांनाच संपविले, चंद्रपुरातील माजरी पोलीस हद्दीतील घटना

कोराडी येथील नाल्याजवळ नेले. दोन मित्रांच्या मदतीनं त्यांची हत्या केली. त्यानंतर मृतदेह फेकून ते परत आले. माजरी पोलिसांनी या प्रकरणाची छडा लावला.

Chandrapur Murder : पत्नीला पळविल्याचा राग, प्रियकराच्या वडिलांनाच संपविले, चंद्रपुरातील माजरी पोलीस हद्दीतील घटना
चंद्रपुरातील माजरी पोलीस हद्दीतील घटना Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 2:58 PM

चंद्रपूर : पत्नीला पळवून नेले म्हणून पती निराश झाला. पत्नीला पळवून नेणाऱ्या तरुणाच्या वडिलांची हत्या केली. हा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. काही दिवंसापूर्वी माजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोराडी नाल्यावरील पुलाखाली एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल (Crime of Murder) करून तपासाला सुरुवात केली. अखेर या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. 50 वर्षीय मृतक रामभाऊ पाटील (Rambhau Patil) हे माजरी कॉलनी (Majri Colony) येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यामध्ये मृतकाच्या मुलाचे आरोपी आशिष पेटकर याच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचे आणि त्याने तिला पळवून नेल्याचे स्पष्ट झाले.

आरोपीला पाच दिवसांची कोठडी

माझ्या पत्नीला का पळवून नेले. म्हणून युवकाच्या वडिलांवर तो राग काढला. आरोपीने दोन साथीदारांच्या मदतीने पूरग्रस्त छावणीत प्रवेश केला. मृतकाला चारचाकी गाडीमध्ये जबरदस्तीने बसवून कोराडी नाल्याजवळ नेले. त्याची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशी माहिती वरोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी यांनी दिली.

काय आहे प्रकरण?

आशिष पेटकर याच्या पत्नीचे दुसऱ्या एका युवकावर प्रेम जळले. ती रामभाऊ पाटील यांच्या मुलासोबत पळून गेली. याचा प्रचंड राग आशिषला आला. तो रागाच्या भरात रामभाऊच्या घरी गेला. पण, मुलगा तिथं नव्हता. रामभाऊ भेटले. त्यांनाच आशिषने चारचाकी गाडीत बसविले. कोराडी येथील नाल्याजवळ नेले. दोन मित्रांच्या मदतीनं त्यांची हत्या केली. त्यानंतर मृतदेह फेकून ते परत आले. माजरी पोलिसांनी या प्रकरणाची छडा लावला. आता आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पत्नी सोडून गेली. म्हणून संताप व्यक्त करण्यात काही अर्थ नव्हता. शांत राहून डोकं ठिकाणावर ठेवून पुढचा मार्ग शोधता आला असता. पण, संतापाच्या भरात खून करून आशिषला आता पश्चातापाशिवाय काही पर्याय नाही.

हे सुद्धा वाचा

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.