बर्थडे पार्टीसाठी कौतुक नाही केलं, भडकलेल्या पत्नीने थेट कोल्डड्रिंकमध्ये विष मिसळून..

त्या महिलेला माउंटन ड्यूमध्ये कीटकनाशक मिसळण्याचं कारण विचारण्यात आलं, तेव्हा तिने पोलिस अधिकाऱ्यांसमोर जो खुलासा केला तो ऐकून सर्वच अवाक् झाले. असं काय म्हणाली ती ?

बर्थडे पार्टीसाठी कौतुक नाही केलं, भडकलेल्या पत्नीने थेट कोल्डड्रिंकमध्ये विष मिसळून..
Follow us
| Updated on: Jul 01, 2024 | 12:27 PM

नवरा-बायकोच्या नात्यात भांडणं, रुसवे-फुगवे हे येतातच. बरीचं भांडणं ही कपातील वादळ ठरतात, पण काही वेळा भांडणांचं , रागाचं स्वरूप वाढतं आणि त्याच रागाच्या भरात व्यक्तीकडून अशी एखादी चूक होते, ज्याचा नंतर पश्चाताप तर होतो पण वेळ हातातून गेलेली असते. अशाच भांडणाचा एक अजब प्रकार अमेरिकेत घडला. जिथे एका महिलेने तिच्यात पतीला विष देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आणि ती त्याच्यावर रागावण्याचं कारण तर एवढं भयानक होतं की ते ऐकून पोलिसही चक्रावले. त्या महिलेने पतीच्या वाढदिवसासाठी पार्टी दिली होती, मात्र त्याने त्याबद्दल तिचं कौतुकच केलं नाही. त्यामुळे ती संतापली आणि तिने माऊंटन ड्यू कोल्डड्रिंकमध्ये कीटकनाशक मिसळून ते पतीला देण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेमुळे सगळेच चक्रावले असून सर्वत्र त्या महिलेची चर्चा आहे. मिशेल असे आरोपी महिलेचे नाव आहे.

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, मिशेलला सोमवारी अटक करण्यात आली आणि तिच्यावर पतीचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. पोलिसांनी तिला जेव्हा तिला माऊंटन ड्यूमध्ये कीटकनाशक मिसळण्याचं कारण विचारल तेव्हा तिने रागाच्या भरात सगळं सांगून टाकलं. मला माझ्या पतीशी ‘क्रूरपणे’ वागायचं होतं. मी त्याच्यासाठी पार्टी आयोजित केली पण त्याला माझं काही कौतुकचं नाही, असं ती म्हणाली.

माझी पत्नी मला विष देत आहे, अशी तक्रार मिशेलच्या पतीने लॅक्लेड काउंटी शेरीफ कार्यालयाकडे तक्रार केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिशेलच्या पतीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्याच्या पत्नीने त्याला माऊंटन ड्यू प्यायला दिले पण तो कॅन विचित्र आहे. सुरूवातीला मी चवीकडे दुर्लक्ष केले आणि पत्नीने दिलेले माऊंटन ड्यू पीत राहिलो. मात्र, काही आठवड्यांनंतर मला घसा खवखवणे, मळमळ, जुलाब आणि उलट्या असा त्रास होऊ लागला, असे त्याने तक्रारीत नमूद केले.

पोलिसांच्या अहवालात असेही म्हटले आहे की जेव्हा मिशेलच्या पती खोकला आला तेव्हा तपकिरी-पिवळा कफही बाहेर पडला. त्यानंतर त्याला संशय आल्याने त्याने घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये त्याची पत्नी फ्रीजमधून सोडा आणि कीटकनाशकाची बाटली घेताना दिसली. काही वेळाने ती परत आली आणि दोन्ही वस्तू परत फ्रीजमध्ये ठेवल्या. ती कीटकनाशकाची बाटली रिकामी होती, असा दावा पतीने केला.

त्यानंतर मिशेलच्या पतीने तिला सांगितलं की मला बरं वाचत नाहीये. पण तुला कोविड झाला असावा असं सांगत मिशेलन तिच्या पतीला कुटुंबियांपासून, नातवंडांपासून दूर ठेवलं. तिचं कुठेतरी अफेअर असाव असा संशयही तिच्या पतीने व्यक्त केला आहे. मिशेलच्या पतीच्या नावे 5 लाख डॉलर्सची विमा पॉलिसी असून ती हडपण्याचा तिचा प्रयत्न आहे, असा आरोपही तिच्या पतीने केला. याप्रकरणी पोलिसांनी मिशेलला अटक केली असून चौकशी सुरू आहे.

Non Stop LIVE Update
विधान परिषदेच्या 11 जागा अन् 12 जण रिंगणात, कोणाची मतं फुटणार?
विधान परिषदेच्या 11 जागा अन् 12 जण रिंगणात, कोणाची मतं फुटणार?.
लाडकी बहीण योजना, सरकारनं बदलला निर्णय, या कागदपत्रांशिवाय मिळणार 1500
लाडकी बहीण योजना, सरकारनं बदलला निर्णय, या कागदपत्रांशिवाय मिळणार 1500.
संसदेत मोदींना बोलणंही अवघड, विरोधकांचा एकच गोंधळ; सभागृहात काय घडलं?
संसदेत मोदींना बोलणंही अवघड, विरोधकांचा एकच गोंधळ; सभागृहात काय घडलं?.
'जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत असली... ', मुख्यमंत्र्यांची थेट ऑफर
'जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत असली... ', मुख्यमंत्र्यांची थेट ऑफर.
दिवे घाटातील माऊलींच्या पालखीचं विहंगम दृश्य; ड्रोनमध्ये कैद नजारा
दिवे घाटातील माऊलींच्या पालखीचं विहंगम दृश्य; ड्रोनमध्ये कैद नजारा.
तुमच्याकडे हे कागदपत्रं आहेत का? तरच मिळणार 'लाडकी बहीण योजने'चा लाभ
तुमच्याकडे हे कागदपत्रं आहेत का? तरच मिळणार 'लाडकी बहीण योजने'चा लाभ.
मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण...भावना गवळी उमेदवारी मिळताच गहिवरल्या
मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण...भावना गवळी उमेदवारी मिळताच गहिवरल्या.
भर सभागृहात शिवीगाळ करणं आलं अंगाशी, अंबादास दानवेंवर मोठी कारवाई
भर सभागृहात शिवीगाळ करणं आलं अंगाशी, अंबादास दानवेंवर मोठी कारवाई.
ज्यांनी जीवन संपवलं ते... संधी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
ज्यांनी जीवन संपवलं ते... संधी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे काय म्हणाल्या?.
हिजाबनंतर आता काँलेजमध्ये जीन्स, टी-शर्टवर बंदी, कॉलेजचा नवा नियम काय?
हिजाबनंतर आता काँलेजमध्ये जीन्स, टी-शर्टवर बंदी, कॉलेजचा नवा नियम काय?.