AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Vaze : गुन्ह्यात वापरलेला दुसरा शर्टही मिळाला, जिथे शर्ट जाळला, तिथे नेऊन वाझेंची चौकशी

Mukesh Ambani bomb scare case : NIA च्या अधिकाऱ्यांना वाझेंनी दिलेल्या माहितीनुसार आणखी एक शर्ट जप्त केला आहे. हे दोन्ही शर्ट गुन्ह्यात वापरले होते.

Sachin Vaze : गुन्ह्यात वापरलेला दुसरा शर्टही मिळाला, जिथे शर्ट जाळला, तिथे नेऊन वाझेंची चौकशी
Sachin Vaze
| Updated on: Mar 18, 2021 | 11:55 AM
Share

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू (Mansukh Hiren death) आणि उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकंप्रकरणात तपासाला वेग आला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA कडून स्फोटकांप्रकरणी तपास होत आहे. याप्रकरणार NIA ने निलंबित API सचिन वाझे ( Sachin Vaze) यांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून एनआयएला महत्त्वाची माहिती मिळत आहे. NIA च्या अधिकाऱ्यांना वाझेंनी दिलेल्या माहितीनुसार आणखी एक शर्ट जप्त केला आहे. हे दोन्ही शर्ट गुन्ह्यात वापरले होते. (Another shirt used in Ambani bomb scare case found near Mulund check post NIA inquired Sachin Vaze)

त्यातला एक सदरा मुलुंड टोलनाक्याजवळ केरोसीनने जाळला होता. त्याच ठिकाणी काल वाझे यांना घेऊन एनआयए अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. त्याशिवाय NIA ने काल रात्री सचिन वाझेंच्या घराच्या कंपाऊंडमधून एक कार जप्त केली. या कारमध्ये महत्वाचे पुरावे सापडल्याचे सांगण्यात येत आहे. NIA कडून आणखी दोन कारचा शोध सुरु आहे.

वाझेंसोबत जो दुसरा व्यक्ती कटात होता त्याचाही शोध लागला असून तो NIA च्या ताब्यात आहे. ती व्यक्ती पोलीस दलातील असल्याची NIA सूत्रांची माहिती आहे. हा संपूर्ण कट पब्लिसीटीसाठी केला असल्याची माहिती सचिन वाझेंनी NIA ला दिली होती. मात्र एनआयए सखोल तपास करत आहे.

सचिन वाझेंच्या घरात झाडाझडती

मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटकं प्रकरणात मुंबई पोलीस दलातील API सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर NIA च्या तपासाला गती मिळाली आहे. सचिन वाझे यांना ठाणे येथील त्यांच्या घरी NIA च्या टीमने आणून काल झाडाझडती घेतली. रात्री मध्यरात्रीपर्यंत NIA ची टीम सचिन वाझे यांच्या घरातच होती. घरातून काही पुरावेही गोळा केले असल्याची सूत्रांची माहिती आहे.

आज पुन्हा सचिन वाझे यांना ठाणे येथे आणून तपास करणार असल्याचेही समजते. जिलेटीन असलेली स्कॉर्पिओ सापडली त्याचा मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह वाझे यांच्या घरापासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मुंब्रा रेतीबंदर खाडीत सापडला होता. ही हत्या की आत्महत्या याचा उलगडा अद्याप झाला नाही. त्यामुळे NIA प्रत्येक घटनास्थळावर जाऊन तपास करीत आहे

या प्रकरणात आणखी कोण दिग्गज आहेत, हा कट रचण्याचे कारण काय हे पूर्ण तापासानंतर समोर येणार आहे.

PPE किटमधील व्यक्ती सचिन वाझेच

केश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेल्या गाडीबाबतचा तपास आता एका 49 सेकंदाच्या व्हिडीओभोवती सुरु आहे. अंबानी यांच्या निवासस्थानाजवळून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती पीपीई किट घालून चालताना दिसून येत आहे. ती व्यक्ती दुसरी-तिसरी कुणी नसून सचिन वाझेच असल्याचा संशय राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA ला आहे. त्यामुळे या 49 सेकंदाच्या व्हिडीओद्वारे आता NIA विविध तज्ज्ञांची मदत घेत संपूर्ण प्रकरणाचा छडा लावणार असल्याचं कळतंय.

VIDEO – गुन्यात वापरलेले दोन्ही शर्ट मिळाले

(Another shirt used in Ambani bomb scare case found near Mulund check post NIA inquired Sachin Vaze)

संबंधित बातम्या  

Special Report | धनंजय गावडेच्या भेटीनंतर हिरेन यांची हत्या, दिल्लीतून फडणवीसांचा गंभीर आरोप

सचिन वाझे प्रकरणात नारायण राणेंकडून आता थेट मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.