आर्यन खान प्रकरणात हॅकर मनीष भंगाळेंची एन्ट्री, धक्कादायक गौप्यस्फोट करत पाच लाखांच्या ऑफरचा दावा
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात हॅकर मनीष भंगाळेंने गौप्यस्फोट केलाय. पुरावे टॅम्पर करण्यासाठी अलोक जैन, शैलेश चौधरी यांनी पाच लाखांची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केलाय. अभिनेता शाहरुख खान याची मॅनेजर पूजा ददलानीच्या मोबाईलचा सीडीआर काढण्यासाठी ही ऑफर दिल्याचा दावा भंगाळे यांनी केलाय.
जळगाव : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात हॅकर मनीष भंगाळेंने गौप्यस्फोट केलाय. पुरावे टॅम्पर करण्यासाठी अलोक जैन, शैलेश चौधरी यांनी पाच लाखांची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केलाय. अभिनेता शाहरुख खान याची मॅनेजर पूजा ददलानीच्या मोबाईलचा सीडीआर काढण्यासाठी ही ऑफर दिल्याचा दावा भंगाळे यांनी केलाय.
भंगाळे यांनी नेमकं काय सांगितलं?
6 ऑक्टोबर रोजी अलोक जैन आणि शैलेश चौधरी या दोन व्यक्ती भेटण्यासाठी जळगाव येथे आल्या होत्या. त्यांनी एका नंबरचा सीडीआर काढून मिळेल का?, असे विचारत पूजा ददलानी या नावाने सेव्ह असलेला नंबर त्याला दाखवला. तसेच त्यांनी एक व्हॉट्सअॅप चॅटचा बॅकअपही दाखवला. तो बॅकअप आर्यन खान नावाने सेव्ह होता’,असा मनीष भंगाळेचा दावा आहे.
या संदर्भात भंगाळे याने मुंबई पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिले आहे आणि या प्रकरणात कुठेतरी पाणी मुरत असल्याने सखोल चौकशी करण्याची मागणी त्याने केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे दाऊदच्या पत्नीशी संभाषण झाल्याचा दावा केल्याने काही वर्षांपूर्वी मनीष भंगाळे चर्चेत आला होता.
पाहा व्हिडीओ –
महाराष्ट्र सरकारची समीर वानखेडेंविरोधात चौकशीची घोषणा
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात अखेर महाराष्ट्र सरकारने चौकशीची घोषणा केली आहे. 25 कोटी रुपयांच्या डीलप्रकरणी समीर वानखेडे यांची आता चौकशी होणार आहे. सरकारने ऑर्डर काढून 4 अधिकाऱ्यांची नावेही जाहीर केली आहेत. एकीकडे नवाब मलिकांच्या आरोपांनी घायाळ झालेले समीर वानखेडे आता राज्य सरकारने लावलेल्या चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत. त्यामुळे समीर वानखेडेंना आता दुहेरी संकटाचा सामना करावा लागणार आहे.
आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं. या प्रतिज्ञापत्रात त्याने धक्कादायक आरोप केले. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला रिलीज करण्यासाठी 25 कोटी रुपयांची डील होणार होती. त्यातले 8 कोटी रुपये समीर वानखेडे यांना मिळणार होते. तसं फोनवरील संभाषण ऐकल्याचा दावा प्रभाकर साईलने केला. याच गंभीर आरोपांची दखल घेत राज्य सरकारने समीर वानखेडे यांच्याविरोधात चौकशीची घोषणा केली आहे.
प्रभाकर साईल, अॅड सुधा द्विवेदी, अॅड कनिष्का जैन आणि नितीन देशमुख यांनी केलेल्या विविध तक्रार अर्जांची एकत्रित चौकशी करण्यासाठी 4 पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक राज्य सरकारकडून जाहीर केली गेली आहे.
आर्यन खान प्रकरणातील पंच के पी गोसावी पोलिसांना शरण जाणार; खुद्द गोसावीचा दावाhttps://t.co/phvkjEDDyl#KPGosavi |#AryanKhan |#NCBPanch |#SurrenderPolice
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 27, 2021
संबंधित बातम्या :
25 कोटीच्या आरोपावर समीर वानखेडेंना बाजुला ठेवलं पाहिजे? फडणवीस म्हणाले, चौकशी झालीच पाहिजे !