Aryan Khan Drugs Case : आर्यन खानला 25 दिवसांनी जामीन, आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?

आज जामीन मंजूर करण्यात आला असला तरी हे तिघेही आज कारागृहाबाहेर पडण्याची शक्यता कमी आहे. त्याबाबत आर्यन खानचे वकील मुकूल रोहतगी यांनी माहिती दिलीय. या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं ते आपण जाणून घेणार आहोत.

Aryan Khan Drugs Case : आर्यन खानला 25 दिवसांनी जामीन, आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी अटक झाली. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातून एनसीबीने आर्यनला अटक केली आहे. आर्यनच्याआधी सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणाने संपूर्ण बॉलिवूडला हादरवून सोडले होते.
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 5:32 PM

मुंबई : क्रूझ ड्रग्स प्रकरणात अखेर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आलाय. मुंबई उच्च न्यायालयात जवळपास तीन दिवस दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा निर्णय घेतलाय. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांनाही जामीन मंजूर करण्यात आला.

तिघेही आज कारागृहाबाहेर पडण्याची शक्यता कमी

दरम्यान, आज जामीन मंजूर करण्यात आला असला तरी हे तिघेही आज कारागृहाबाहेर पडण्याची शक्यता कमी आहे. त्याबाबत आर्यन खानचे वकील मुकूल रोहतगी यांनी माहिती दिलीय. या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं ते आपण जाणून घेणार आहोत.

आतापर्यंत या प्रकरणात नेमकं काय काय घडलं?

2 ऑक्टोबर : कथित ड्रग्स पार्टी मुंबईजवळच्या समुद्रात सुरू होती, क्रूझ पार्टीवर छापा टाकला 3 ऑक्टोबरः शाहरुखच्या मुलासहीत तीन जण ताब्यात, आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धुमेचाला अटक झाली 4 ऑक्टोबरः ड्रग्स कारवाईतला पहिला वाद चव्हाट्यावर आला. तसेच के. पी. गोसावीचा आर्यनबरोबरचा एक सेल्फी व्हायरल झाला आणि हाच या प्रकरणातला पहिला वाद ठरला 6 ऑक्टोबरः नवाब मलिकांकडून पत्रकार परिषद घेऊन कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, कारवाई बनावट असल्याचा दावा, मनीष गोसावीवर प्रश्नचिन्ह, त्यानंतर एनसीबीनं पत्रकार परिषद घेत गोसावी आणि भानुशाली साक्षीदार असल्याचं सांगितलं. 7 ऑक्टोबरः मनीष भानुशाली समोर आला, त्यानं देशहितासाठी एनसीबीला ड्रग्स पार्टीची टिप दिल्याचा दावा केला, मनुष्यबळ कमी असल्यानं अरबाज मर्चंडला एनसीबी कार्यालयात नेल्याचं भानुशालीनं सांगितलं. 9 ऑक्टोबरः नवाब मलिका पुन्हा एकदा समोर आले, छापेमारीवेळी 11 नव्हे, तर 14 लोकांना ताब्यात घेतल्याचा दावा, भाजप नेत्याच्या नातलगासह तीन जणांना एनसीबीनं सोडल्याचं मलिकांनी सांगितलं. 14 ऑक्टोबरः पुणे पोलिसांनी एनसीबी प्रकरणातला साक्षीदार के. पी. गोसावीविरोधात फसवणुकीच्या गुन्ह्यात लूकआऊट नोटीस जारी केली. 16 ऑक्टोबरः नवाब मलिकांनी थेट समीर वानखेडे आणि त्यांच्या बहीण यास्मिन वानखेडेंवर खंडणीचे आरोप केले. कोरोना काळात सेलिब्रिटींना धमकावून दोघांनी मालदीवमध्ये प्रकरण सेटल केल्याचा आरोप केला. यास्मिन वानखेडेंनी पुरावे देण्याचं आवाहन केलं. 21 ऑक्टोबरः चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेला एनसीबीनं समन्स पाठवलं, आर्यन खान प्रकरणात तिचा सहभाग असल्याच्या संशयावरून तिच्या घरावर छापा टाकला 24 ऑक्टोबरः या प्रकरणातला साक्षीदार प्रभाकर साईलकडून प्रकरणाला नवं वळण, साक्षीदारानंच समीर वानखेडेंवर खंडणीचा आरोप केला, प्रभाकर साईल हा के. पी. गोसावीचा बॉडीगार्ड आहे. 25 ऑक्टोबरः समीर वानखेडेंनी खोटं जात प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळवल्याचा नवाब मलिकांचा दावा, त्यानंतर समीर वानखेडेंची चौकशी सुरू 26 ऑक्टोबरः समीर वानखेडे यांची पत्नी आणि बहीण यांनी नवाब मलिकांचे आरोप फेटाळले, तसेच त्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. 27 ऑक्टोबरः क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील दोन आरोपींना जामीन मिळाला आहे. विशेष एनडीपीएस न्यायालयाने या जामीन अर्जाला परवानगी दिली आहे. अवीन साहू आणि मनीष राजगरिया यांना जामीन मिळाला आहे. 28 ऑक्टोबरः तीन आठवडे उलटून गेले तरी मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी त्याला जामीन मिळालेला नाही. कोर्टाने आजचा युक्तीवाद संपल्यानंतर सुनावणी उद्यावर ढकलली आहे. कोर्टात आजी तीनही आरोपींच्या वकिलांनी बाजू मांडली. 29 ऑक्टोबरः मुंबई उच्च न्यायालयाने तिनही आरोपींना जामीन दिला आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. माननीय उच्च न्यायालयाने जवळपास तीन दिवस दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत उद्या मिळेल आणि मला आशा आहे की हे तिघेही उद्या संध्याकाळपर्यंत किंवा शनिवारी बाहेर येतील, अशी माहिती आर्यन खानचे वकील मुकुल रोहतगी यांनी दिली. संबंधित बातम्या

Aryan Khan : आरोपींना जामीनावर सोडलं तर साक्षी-पुराव्यांविषयी छेडछाड करु शकतात, एनसीबीच्या वकिलांचा जामीनाला तीव्र विरोध

मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी बेमुदत संपावर, कारवाई केली तर परिवहन मंत्र्यांच्या दारात आंदोलन, गोपीचंद पडळकरांचा इशारा

Aryan Khan gets bail after 25 days, what exactly has happened so far?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.