आधी तरुणीने लग्नाला नकार दिला, मग प्रियकराचं अपहरण; पोलिसांनी ‘असं’ फोडलं बिंग

राम नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणाचा शोध सुरू झाला. तब्बल 10 तासांच्या तपासानंतर मोबाईल लोकेशनच्या मदतीने पोलिसांनी तरुणाचा शोध लावला.

आधी तरुणीने लग्नाला नकार दिला, मग प्रियकराचं अपहरण; पोलिसांनी 'असं' फोडलं बिंग
डोबिवलीत तरुणाचा अपहरणाचा बनावImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Oct 01, 2022 | 5:02 PM

सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली : सध्या प्रेमप्रकरण फिस्कटल्यानंतर तरुण-तरुणी काय करतील याचा नेम नाही. कधी प्रेयसी व्हिलन बनते तर कधी प्रियकर आणि मग काय पोलीसही लागतात कामाला. पण एकतर्फी प्रेम (One Sided Love) प्रकरणातले किस्सेचं वेगळे. असाच एक भयंकर किस्सा डोंबिवलीत उघडकीस आला आहे. जिच्यावर मनापासून प्रेम केलं तिने लग्नाला नकार (Rejection of Marriage) दिल्याने एका तरुणाने स्वतः च्याच अपहरणाचा डाव (Kidnapping Plan) रचला. यामुळे तब्बल 10 तास पोलिसांची तारांबळ उडाली.

तरुणीला आणि तिच्या कुटुंबीयांना अडकवण्यासाठी तरुणाचा बनाव

तरुणीला आणि तिच्या कुटुंबियांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी एकतर्फी प्रेम करणाऱ्या मजनूने हा सर्व खटाटोप केला पण पोलिसांनी त्याचे बिंग फोडले. त्याचा सर्व प्लॅन पाण्यात गेला. पण या तरुणाचा हा कारनामा पाहून पोलिसांच्याही भुवया उंचावल्या.

परिसरातील तरुणीवर होते एकतर्फी प्रेम

डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर परिसरात ही वनसाईड लव्ह स्टोरी घडली आहे. हा माथेफिरू तरुण याच परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहतो. परिसरात राहणाऱ्या तरुणीवर त्याचे एकतर्फी प्रेम जडले. मात्र तरुणीने लग्नाला नकार दिला. तरुणीच्या कुटुंबीयांनीही तरुणाची समजूत काढली.

हे सुद्धा वाचा

मात्र हा माथेफिरू तरुण काही ऐकायला तयार नव्हता. अखेर तरुणीच्या कुटुंबीयांनी त्याला दम दिला. अखेर संतापलेल्या तरुणाने तरुणी आणि तिच्या कुटुंबियांवर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी स्वतःच्याच अपहरणाचा डाव रचला.

वडिलांना अपहरणाचा मॅसेज केला

तरुणाने आपल्या वडिलांच्या मोबाईलवर मेसेज केला की “तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे, पोलिसांना सांगितलं तर बॉडी घरी येईल”. घाबरलेल्या वडिलांनी राम नगर पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली.

10 तासांच्या तपासानंतर तरुणाचा शोध

राम नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणाचा शोध सुरू झाला. तब्बल 10 तासांच्या तपासानंतर मोबाईल लोकेशनच्या मदतीने पोलिसांनी तरुणाचा शोध लावला.

तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. या तरुणाने स्वतःचा अपहरणाचा बनाव रचल्याचं समोर आलं. त्यानेच आपल्या वडिलांना खोटे मेसेज पाठवले. सत्य समोर आल्यानंतर पोलिसांनीही डोक्यावर हात मारला.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.