उल्हासनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अँटी करप्शनच्या जाळ्यात, लाच घेताना अटक

बांधकाम ठेकेदाराकडे लाच मागितल्याप्रकरणी उल्हासनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अजित गोवारी यांच्यासह प्रभाग समितीचा मुकादम आणि कंत्राटी चालक यांना अटक केली. ठाणे लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली.

उल्हासनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अँटी करप्शनच्या जाळ्यात, लाच घेताना अटक
लाच घेतल्याप्रकरणी उल्हारनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अजित गोवारींना अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 9:46 AM

उल्हासनगर / निनाद करमरकर : उल्हासनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अजित गोवारी हे अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकले आहेत. एका बांधकाम ठेकेदाराकडून 20 हजारांची लाच घेताना गोवारी यांच्यासह प्रभाग समितीचा मुकादम आणि कंत्राटी चालक यांना ठाणे अँटी करप्शन विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. बांधकामाच्या परवानगीसाठी गोवारी यांनी मुकादमाच्या मार्फत ही लाच मागितली होती. याप्रकरणी ठेकेदाराने ठाणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरुन ठाणे लाचलुचपचत विभागाने सापळा रचून आरोपींना पडकले

बांधकाम परवानगीसाठी मागितली लाच

उल्हासनगरचे बांधकाम ठेकेदार अनिल करोतिया हे एक बांधकाम करत होते. हे बांधकाम उल्हासनगर महापालिकेने दोन वेळा तोडलं. यानंतर पुन्हा बांधकाम करायचं असेल, तर 50 हजार रुपये लाच द्यावी लागेल, अशी मागणी सहाय्यक आयुक्त अजित गोवारी यांनी मुकादम प्रकाश सकट याच्या माध्यमातून केली.

तडजोडीअंती 20 हजार रुपये देण्याचं ठरलं

तडजोडीअंती 20 हजार रुपये देण्याचं ठरल्यावर सकट याने ही रक्कम स्वीकारून गोवारी यांचा वाहनचालक असलेल्या कंत्राटी चालक प्रदीप उमाप याला दिली. यावेळी अँटी करप्शन विभागाने सकट आणि उमाप या दोघांना बेड्या ठोकल्या. त्यांच्या चौकशीत त्यांनी सहाय्यक आयुक्त अजित गोवारी यांच्यासाठी पैसे घेतल्याचं सांगितल्यानं गोवारी यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

तहसील कार्यालयातील वाहनचालकाला लाच स्वीकारताना अटक

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील तहसील कार्यालयातील वाहनचालक अनिल आगीवले याला दीड लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. तक्रारदाराने मौजे शिरसाठे येथील गट क्रमांक 176 मधील शेतजमीन विकत घेण्यासाठी विसारपावती नोटरी केली होती.

शेतजमीन संदर्भात तत्कालीन उपविभागीय अधिकारी इगतपुरी-त्र्यंबकेश्वर येथे वाद चालू होता. या वादाचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने करून दिल्याच्या मोबदल्यात वाहनचालक अनिल याने 2 लाख रुपयांची लाच मागितली होती.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.