AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठ्या बहिणीने लहान बहिणीला संपवले, कारण ऐकून थक्क व्हाल !

अहमदनगरमध्ये कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात 30 सप्टेंबर रोजी 17 वर्षीय मुलीचा मृतदेह तिच्याच घरात लटकलेला आढळून आला होता.

मोठ्या बहिणीने लहान बहिणीला संपवले, कारण ऐकून थक्क व्हाल !
नोकरीच्या वादातून दिल्लीत तिहेरी हत्याकांड
| Updated on: Oct 06, 2022 | 11:19 PM
Share

मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी : प्रेम प्रकारणाबद्दल घरच्यांना माहिती दिली तसेच प्रियकरासोबत पळून जाण्यास‌ विरोध केल्याच्या रागातून मोठ्या बहिणीने लहान बहिणीची हत्या (Sister Killed Sister) केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव (Kopargaon Ahmednagar) येथे घडली आहे. हत्या करुन आत्महत्या केल्याचे दर्शवण्यात आले होते. मात्र पोलीस तापासात आरोपी बहिणीचे बिंग फुटले. कोपरगाव शहर पोलिसांनी आरोपी बहिणीला बेड्या (Police Arrested Sister) ठोकल्या आहेत.

घरातच मृतदेह आढळून आला होता

अहमदनगरमध्ये कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात 30 सप्टेंबर रोजी 17 वर्षीय मुलीचा मृतदेह तिच्याच घरात लटकलेला आढळून आला होता. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे भासत होते.

तपासाअंती हत्या झाल्याचे उघड

मात्र तपासाअंती आत्महत्या नसून हत्या झाल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांची कसून चौकशी केली असता मुलीच्या मोठ्या बहिणीनेच तिची हत्या केल्याचे उघड झाले.

याप्रकरणी पोलिसांनी मोठ्या बहिणीला अटक केली आहे. तिची चौकशी केली असता तिने हत्येची कबुली देत कारणही स्पष्ट केले. सृष्टी बनकर असे 19 वर्षीय आरोपी बहिणीचे नाव आहे.

प्रेमप्रकरणाबद्दल घरी सांगितल्याने हत्या

सृष्टी हिचे श्रीरामपूर तालुक्यातीलआकाश कांगुणे नामक तरुणासोबत प्रेमसंबंध होते. ती त्या तरुणासोबत पळून जाऊन लग्न करणार होती. मात्र ही बाब लहान बहिणीला कळाली आणि तिने घरच्यांना सर्व प्रकार सांगितला.

यानंतर घरच्यांनी तिला समज दिली होती तसेच काही दिवस कॉलेजला जाऊ नकोस अशी सक्त ताकीद दिली होती. त्यातूनच प्रेमात आंधळी झालेल्या मुलीने मागचा पुढचा कुठलाही विचार न करता बहिणीची हत्या केल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे.

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.