गॅस कटरनं एटीएम फोडनं सुरू होतं… चोरांचा प्लॅन यशस्वी होत आला होता…पण जीव वाचवत सगळं सोडून पळावं लागलं
नाशिकच्या मालेगाव परीसरात मालेगाव कॅम्प पोलिसांच्या सतर्कतमुळे एटीएम चोरीचा प्रयत्न फसल्याने मोठी चर्चा होऊ लागली आहे.
मालेगाव (नाशिक) : नाशिक जिल्ह्यातील गुन्हेगारी काही केल्या कमी व्हायला तयार नाहीये, नाशिकच्या ग्रामीण दरोडयांचे सत्र सुरूच आहे. त्यातच मालेगावमधील सटाणा नाक्यावरील असलेल्या ॲक्सिस बँकेचं एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसल्याची घटना समोर आली आहे. खरंतर ग्रामीण भागातील सिन्नर, इगतपुरी आणि दिंडोरी परिसरात घरफोड्या आणि दरोडे सुरूच आहेत. मालेगावमधील एटीएम फोडण्याचा प्रकार सरू असतांनाच पोलीस आल्याने चोरांचा डाव फसल्याचे समोर आले आहे. मालेगाव शहरातील सटाणा रोडवरील ॲक्सिस बँकेचं एटीएम फोडण्याचा प्रयत्न सुरू असताना गस्तीवर असलेल्या मालेगाव कॅम्प पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी सायरन वाजवले, पोलिसांची गाडी येताच चोरांना लक्षात आले आणि पोलीस एटीएममध्ये पोहचताच चोरी करण्यासाठी आणलेले साहित्य गॅस कटर, पक्कड, गोण्या आणि गॅस सिलेंडर सोडून चोर फरार झाले आहे.
घटनास्थळी पोलिस पोचल्याने चोराचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला आहे. पोलिसांनी सर्व साहित्य ताब्यात घेतले असून सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
नाशिकच्या मालेगाव परीसरात मालेगाव कॅम्प पोलिसांच्या सतर्कतमुळे एटीएम चोरीचा प्रयत्न फसल्याने मोठी चर्चा होऊ लागली आहे.
पहाटेच्या वेळी मालेगाव पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू असताना पहाटेच्या सुमारास पोलिसांना घटना आली लक्षात होती, गस्त सुरू असल्याने मोठी घटना टळली असली तरी दरोडेखोरांचा सुळसुळाट सुरू असल्याचे बघायला मिळत आहे.
गॅस कटरच्या सहाय्यानं अलीकडे एटीएम चोरीच्या घटना घडत घडत असल्यान एटीएमच गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न मालेगावमध्ये सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
सीसीटीव्ही मॉनिटरिंग सुरू असतांना ही बाब लक्षात आली होती, मात्र मालेगाव पोलीसांच्या ऐवजी सटाणा पोलिसांकडे ही बाब बँकेच्या मॉनिटरिंग कंपनीने तात्काळ कळविली होती.
सटाणा पोलीसांनी याबाबत मालेगाव पोलिसांना माहिती दिली होती, परंतु त्याआधीच गस्तीवरील पोलीसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली होती.