पंधरा दिवसांपूर्वी जामिनावर सुटका, सराईत गुन्हेगाराची दगडाने ठेचून हत्या

औरंगाबादच्या बजाजनगर परिसरात अत्यंत रहदारीच्या रस्त्यावर रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. (Aurangabad Criminal Murder due to pre-enmity)

पंधरा दिवसांपूर्वी जामिनावर सुटका, सराईत गुन्हेगाराची दगडाने ठेचून हत्या
15 दिवसांपूर्वी तुरुंगातून सुटका, भररस्त्यात दगडाने ठेचून हत्या
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 8:28 AM

औरंगाबाद : एका सराईत गुन्हेगाराची दगडाने ठेचून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशाल फाटे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. औरंगाबादच्या बजाजनगर परिसरात अत्यंत रहदारीच्या रस्त्यावर रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. पूर्व वैमनस्यातून खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. (Aurangabad Criminal Murder due to pre-enmity)

मिळालेल्या माहितीनुसार, बजाज नगर या भागात काल (21 मे) एका तरुणास दोन अनोळखी व्यक्ती मारहाण करत असल्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना एक अनोळखी तरुण रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसले. तसेच त्याचा चेहरा दगडाने ठेचलेला असल्याचेही पोलिसांना दिसून आले. यावेळी पोलिसांनी त्याला उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यापूर्वी त्याला मृत घोषित करण्यात आले.

पंधरा दिवसांपूर्वीच जामिनावर सुटका

बजाज नगर परिसरात दगडाने ठेचून खून केलेल्या मृत तरुणाची ओळख पटली आहे. या मृत तरुणाचे नाव विशाल ऊर्फ मड्ड्या किशोर फाटे (27) असे आहे. विशाल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे 7 ते 8 गुन्हे दाखल आहेत. तसेच गेल्यावर्षी वडगावात योगेश प्रधान या तरुणाच्या खून प्रकरणात तो आरोपी आहे. या प्रकरणी विशाल हा वर्षभर हर्सूल कारागृहात होता. पंधरा दिवसांपूर्वीच विशालची जामिनावर सुटका झाली होती. तो घरी परतला होता.

पूर्व वैमनस्यातून खून झाल्याचा अंदाज

वडगाव- बजाजनगरात वर्चस्व प्रस्थापित करण्यावरून गेल्या काही वर्षांपासून दोन गटांत सतत वादविवादाच्या घटना घडत आहेत. गेल्यावर्षी 17 मे रोजी योगेश प्रधान या तरुणाचा चाकूने वार करत दगडाने ठेचून निर्घृणपणे खून करण्यात आला होता. यात चार आरोपींचा समावेश होता. जितेंद्र दहातोंडे, विकास गायकवाड, करण साळे आणि विशाल फाटे अशी या चौघांची नावे आहेत. योगेश प्रधान याच्या खूनाचा बदला घेण्यासाठी जामिनावर सुटलेल्या विशाल फाटे खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. (Aurangabad Criminal Murder due to pre-enmity)

संबंधित बातम्या : 

कोव्हिड रुग्णालयातून डिस्चार्जची तयारी, मात्र कोरोना रुग्णाचा रुग्णालयातच गळफास

सॉरी बाबा, सासरी येऊन चुकले, रडत-रडत व्हिडीओ रेकॉर्ड, विवाहितेची आत्महत्या

माजी पोलीस अधिकाऱ्याकडून लैंगिक शोषण, दोन महिलांची हत्या, घरात 14 मृतदेहांचा खच, हत्येचं गूढ कसं उलगडणार?

'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.