खर्च पेलत नसल्याने दोन वेळा लग्न मोडले, वडिलांवर कर्जाचा डोंगर नको म्हणून शेतकरी कन्येची आत्महत्या
लग्नखर्चाच्या धास्तीने एका शेतकऱ्याच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या (Farmer Daughter Died By Suicide) केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत घडली.
औरंगाबाद : लग्नखर्चाच्या धास्तीने एका शेतकऱ्याच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या (Farmer Daughter Died By Suicide) केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत घडली. औरंगाबाद जिल्ह्यातील लाडगाव या गावात ही घटना घडली. वैशाली राधाकिशन जाधव, असं आत्महत्या केलेल्या शेतकरी कन्येचं नाव आहे (Farmer Daughter Died By Suicide).
घरची परिस्थिती हलाखीची, लग्नखर्च पेलत नसल्यामुळे दोन वेळा लग्न मोडले. लग्नासाठी वडिलांवर कर्जाचा डोंगर नको, म्हणून या मुलीने आत्महत्या केली. तशी सुसाईड नोटही तिने लिहून ठेवली आहे. तिने घरातील पाईपला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी (24 फेब्रुवारी) पहाटे चार वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.
करमाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडगाव येथील एका तरुणीने राहत्या घरात बुधवार पहाटे चार वाजता ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, घटनास्थळी दाखल होऊन सदर तरुणीला खाली उतरुन औरंगाबाद शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
दरम्यान, त्या ठिकाणी तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिट्ठी लिहून ठेवली होती. “माझ्या वडिलांची परिस्थिती अंत्यत गरीब आहे. त्यामुळे माझे दोन वेळेस जुळलेलं लग्न मोडून गेले. त्यामुळे गरीब वडिलांना यांचा मनस्ताप सहन करावा लागला. पुढे माझे लग्न करायचे तर कर्ज काढून वडिलांना करावे लागणार. त्यामुळे मी माझे जीवन संपवित आहे”, असे चिट्ठीत लिहून या तरुणीने आपलं जीवन संपवलं.
या प्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गैरहजेरीच्या परवानगीसाठी कॉलेजला गेला आणि वर्गातच गळफास घेतला, नगरच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येने खळबळhttps://t.co/XVv8FHanGj#Suicide #Ahmadnagar
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 25, 2021
Farmer Daughter Died By Suicide
संबंधित बातम्या :
आईस्क्रिममध्ये विष मिसळून आत्महत्येचा प्रयत्न, महिला बचावली, अनवधानाने मुलगा-बहिणीचा मृत्यू
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण आत्महत्येचे, गुन्हा मानूनच तपास सुरु : पोलीस महासंचालक
गर्भपात आणि आत्महत्या केलेली पूजा एकच, संजय राठोडांची चौकशी झालीच पाहिजे : चित्रा वाघ