Aurangabad | बाईक चोरीसाठी पोलिसांनी मुलाला पकडल्याचा धसका, हार्ट अटॅकने वडिलांचा मृत्यू
चोरी प्रकरणात मुलाला अटक होताच वडिलांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतल्याचा वडिलांनी इतका धसका घेतला, की त्यांची प्रकृती सुधारलीच नाही. अखेर हार्ट अटॅकनंतर त्यांचा मृत्यू झाला.
औरंगाबाद : पोलिसांनी मुलाला अटक केल्याचं समजताच वडिलांना मोठा धक्का बसला. यावेळी आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्याने पित्याचा जीव घेतला. औरंगाबाद जिल्ह्यात हा हृदयाला चटका लावणारा प्रसंग समोर आला आहे.
काय आहे प्रकरण?
औरंगाबादमध्ये राहणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बाईक चोरी प्रकरणात अटक केली होती. अमजद शेख असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. आपल्या मुलाला पोलिसांनी बेड्या ठोकल्याचं त्याच्या वडिलांना समजलं आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
मुलाला पोलिसांनी अटक केल्याचा धसका
चोरी प्रकरणात मुलाला अटक होताच वडिलांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतल्याचा वडिलांनी इतका धसका घेतला, की त्यांची प्रकृती सुधारलीच नाही. अखेर हार्ट अटॅकनंतर त्यांचा मृत्यू झाला.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
शब्बीर शेख असे या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या वडिलांचे नाव आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील तारू पिंपळगाव येथे ही घटना घडली. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
संबंधित बातम्या :
पार्किंगमधून बाईक गायब, विचारले तर रेकॉर्ड बुकातील कागदच फाडला; मुजोर पार्किग चालकास पोलीस कोठडी
मद्यधुंद चालकाने कार बीआरटी बसथांब्याला धडकवली दोन ठार ; दोन गंभीर
कल्याणमध्ये दीड वर्षीय चिमुकलीच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टर आणि सहकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल