Video : याला म्हणतात ‘आ बैल मुझे मार’! औरंगाबादेच्या फुलंब्रीचा व्हिडीओ व्हायरल

सामान्य लोकं फटाके फोडून दिवाळी साजरी करतात आणि औरंगाबादेत? पृथ्वी गोलंय, औरंगाबादचा विषय खोलंय!

Video : याला म्हणतात 'आ बैल मुझे मार'! औरंगाबादेच्या फुलंब्रीचा व्हिडीओ व्हायरल
थरारक व्हिडीओImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 25, 2022 | 12:28 PM

औरंगाबाद : कोरोनानंतर मोठ्या जल्लोषात, फटाक्यांच्या आतषबाजीत यंदा दिवाळी साजरी (Diwali Celebration) होतेय. दोन वर्षांची कसर काढण्यासाठी सगळ्यांनीच कंबर कसली आहे. दिव्यांची रोषणाई आहे. रांगोळीत रंगांची उधळण आहे. फटाके फोडण्याच्या (Fire Crackers) उत्साहाला काही मोजमापच नाही. खरंतर सर्वसामान्यपणे फटाके फोडू नका, असं आवाहन केलं जातं. प्रदूषण टाळण्यासाठी फटाके न फोडण्यासाठी जनजागृती केली जाते. पण तरिही दरवर्षी दिवाळीला फटाके फुटतातच. सर्वसामान्य माणसं फटाके फोडून दिवाळी साजरी करतात. पण औरंगाबादचा (Aurangabad News) पॅटर्नच वेगळाय. औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील एके ठिकाणी चक्क एकमेकांवर फटाके फोडण्यात आलेत. याचा व्हिडीओही आता व्हायरल झालाय.

औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्हिडीओ समोर आलाय. या ठिकाणी तरुणांचे तीन गट एकमेकांवर फटाके फोडत होते. फटाके फोडण्याचा हा थरार मोबाईल कॅमेऱ्यातही कैद करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ :

यावेळी तरुणांचे तीन गट एकमेकांवर फटाके पेटवून सोडून देत होते. यातून दुसरा गट फटाके चुकवण्यासाठी सैरावैरा पळत होता. तर तिसरा गट प्रतिहल्ला म्हणून पहिल्या गटावर पुन्हा फटाके पेटवून सोडत होता.

एकमेकांच्या अंगावर फटाके फोडण्याचा हा जीवघेणा प्रकार थरकाप उडवणारा आहे. अनेकदा फटाके फुटण्याच्या नुसत्या आवाजाने लोकांना धडकी भरते. इथे तर जळते फटके, रॉकेट एकमेकांच्या अंगावर सोडले जात असल्याचं दिसून आलं.

हा प्रकार पाहून तरुणांना जीवाची पर्वाच नाहीये की काय, असा प्रश्नही उपस्थित होतोय. एकदा फटाका चुकून अंगावर फुटला तर शरीर भाजू शकतं. जखम होऊ शकते.

दिवाळी साजरी करण्याच्या निमित्ताने असा जीवघेणा खेळ करणं कितपत योग्य, असा सवालही या व्हिडीओमुळे उपस्थित झालाय. सध्या या व्हायरल व्हिडीओवरुन सोशल मीडियात चित्र विचित्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्यात.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.