बिल्डरकडे पंधरा लाखांच्या खंडणीची मागणी, औरंगाबादेत आरोपी रंगेहाथ सापडला

जमिनीचा फेर घेण्याची प्रक्रिया सुरु असताना माहिती अधिकारात वारंवार अर्ज करून अडथळे आणत जमीन मालकाकडून पंधरा लाखांची खंडणी घेताना आरोपीला अटक करण्यात आली

बिल्डरकडे पंधरा लाखांच्या खंडणीची मागणी, औरंगाबादेत आरोपी रंगेहाथ सापडला
बिल्डरकडून खंडणी घेताना आरोपी ताब्यात
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 10:55 AM

औरंगाबाद : पंधरा लाख रुपयांची खंडणी घेणाऱ्या आरोपीला औरंगाबाद पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. जमिनीचा फेर घेण्याची प्रक्रिया सुरु असताना माहिती अधिकारात वारंवार अर्ज करून अडथळे आल्यानंतर जमीन मालकाकडे तब्बल पंधरा लाखांची खंडणी मागणाऱ्या आणि स्वीकारणाऱ्या आरोपीला सिटी चौक पोलिसांनी सापळा रचून रात्री अटक केली. (Aurangabad Man arrested for taking ransom of 15 lacks from Builder)

नेमकं काय घडलं?

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. औरंगाबादमधील आरेफा कॉलनी येथील रहिवासी शेख महंमद साबेर शेख महंमद शरीफ यांचा प्लेटिंग आणि बिल्डरचा व्यवसाय आहे. हिलाल कॉलनीच्या पाठीमागे साबेर यांनी जमीन घेतली. या जमिनीचा फेर घेण्याची प्रक्रिया सुरू होती.

माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत तक्रारी

मीर फकीर अली जिद्दी याने फेर होऊ नये, यासाठी माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत तक्रारी सुरु केली. त्यामुळे साबेर यांच्या कामात अडथळा निर्माण होत होता, या प्रकरणी आरोपी तब्बल 15 लाख रुपयांची खंडणी मागत होता. त्रस्त साबेर यांनी सिटी चौक पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली, शेवटी आरोपीला पोलिसांनी रंगेहाथ ताब्यात घेतले.

नागपुरातही खंडणीखोराला अटक

दरम्यान, ऑटोमोबाइल्स शॉपच्या मालकाच्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला धमकावत, तिला घरच्यांच्या हत्येचा धाक दाखवत घरातून 50 लाख आणण्याची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच नागपूरमध्ये उघडकीस आला होता. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीसह दोघांना अटक केली.

मो नईम अशरफ अब्दुल जब्बार हे पाचपावलीतील सिद्धार्थनगरात राहतात. त्यांचे गंगाबाई घाट मार्गावर ऑटोमोबाइल्स शॉप आहे. आर्थिक स्थिती चांगली असलेल्या नईम यांच्याकडे पक्षांना दाणे टाकण्यासाठी 17 वर्षीय नोकर होता. महिनाभर काम करून त्याने तेथून काम सोडले. नईम यांची आर्थिक स्थिती भक्कम असून घरात मोठ्या प्रमाणात रोख आणि दागिने असते, याची त्याला कल्पना आली होती. त्यामुळे त्याने आपल्या दोन साथीदारांसह नईम यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचा कट रचला होता.

संबंधित बातम्या :

कारच्या सीटखालून 70 किलो गांजाची तस्करी, यूपीच्या आरोपीला नागपुरात अटक

पक्षांना दाणे टाकणाऱ्याचा 50 लाख लुटण्याचा प्रयत्न, अल्पवयीनसह दोघांना अटक

(Aurangabad Man arrested for taking ransom of 15 lacks from Builder)

'जे चाललंय ते...', महायुतीच्या रखडलेल्या शपथविधीवरून पवारांचा हल्लाबोल
'जे चाललंय ते...', महायुतीच्या रखडलेल्या शपथविधीवरून पवारांचा हल्लाबोल.
मुंबईकरांचा प्रवास लवकरच आरामदायी होणार, काय आहे मोठी बातमी?
मुंबईकरांचा प्रवास लवकरच आरामदायी होणार, काय आहे मोठी बातमी?.
उद्या लोकलने प्रवास करणार आहात? मग हा व्हिडीओ बघा, कसा असणार मेगाब्लॉक
उद्या लोकलने प्रवास करणार आहात? मग हा व्हिडीओ बघा, कसा असणार मेगाब्लॉक.
डॉक्टरकडे तपासणीसाठी गेली तरूणी अन्... काय घडलं? बीडमध्ये बंदची हाक
डॉक्टरकडे तपासणीसाठी गेली तरूणी अन्... काय घडलं? बीडमध्ये बंदची हाक.
मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 5 डिसेंबरला? दिल्लीत ठरलं कोणाला कोणती खाती?
मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 5 डिसेंबरला? दिल्लीत ठरलं कोणाला कोणती खाती?.
'देवेंद्र' 3.0, बस नाम ही काफी है... दिल्लीत फडणवीसांच्या नावावर मोहोर
'देवेंद्र' 3.0, बस नाम ही काफी है... दिल्लीत फडणवीसांच्या नावावर मोहोर.
'..तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार', भाजप तयार नाही अन् शिंदे अडून बसले
'..तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार', भाजप तयार नाही अन् शिंदे अडून बसले.
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?'
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?'.
मोठी बातमी, ... तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदे अडून बसले
मोठी बातमी, ... तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदे अडून बसले.
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!.