Baba Siddiqui Murder : बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांनी वापरलेली बाईक सापडली, रेकीसाठी वापरल्याचा संशय
गेल्या आठवड्यात शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची भररस्त्यात हत्या झाली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून इतर तीन आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोंपीकडून अनेक महत्वपूर्ण माहिती मिळत आहे. याच दरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे.
गेल्या आठवड्यात शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची भररस्त्यात हत्या झाली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून इतर तीन आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोंपीकडून अनेक महत्वपूर्ण माहिती मिळत आहे. याच दरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपींनी वापरलेली बाईक कुर्ला परिसरात सापडली आहे.
या हत्याकांडातील आरोपी धर्मराज कश्यप याची ही बाईक पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. हत्येपूर्वी महिनाभर आधी आरोपींनी सिद्दीकी यांची रेकी केली होती. त्यावेळी रेकीसाठी हीच बाईक वापरल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोपी कुर्ला येथे एक खोली भाड्याने घेऊन रहात होते, तेथेच अपाचे कंपनीची काळ्या रंगाची ही बाईक पार्क करण्यात आली होती.
सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील तीन आरोपी आहेत, ज्यांनी त्यांच्यावर शनिवारी गोळीबार केला होता. धर्मराज कश्यप, गुरनैल सिंग आणि शिवकुमार अशी तिघांची वे असून धर्मराज आणि गुरनेल याला अटक करण्यात आली आहे, तर शिवकुमार हा अद्याप फरार आहे. आरोपींपैकीच एक धर्मराज कश्यप याची ही बाईक असल्याची माहिती मिळत आहे. कुर्ला येथील पोलीस पडल चाळ आहे तिथेची ही बाईक सापडली.
गेल्या अनेक दिवसांपासून ही बाईक तेथे पार्क केल्याचे समजते. बाईकच्या नेमप्लेटची अर्धी बाजू तुटलेली आढळली. सिद्दीकी यांची हत्या करण्यापूर्वी आरोपींनी सुमारे महिनाभर त्यांची रेकी केली होती. त्यासाठी बाईकचा वापर करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. ही बाईक नेमकी कोणाच्या नावावर आहे, ती धर्मराज कश्यप याच्या मालकीची आहे की चोरीची, ती कुठून आणली ? आरोपींना बाईक कशी मिळाली ? असे अनेक प्रश्न सध्या पोलिसांसमोर असून ते सर्व बाजूंनी तपास करत आहेत. थोड्याच वेळात पोलिस घटनासअथळी पोहोचून गाडीचा पंचनामा करतील आणि ताब्यात घेतील असे समजते.