AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshay Shinde Encounter Case : मोठी बातमी, अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात कोर्टाने पोलिसांना ठरवलं दोषी

Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात एक मोठी अपडेट आहे. पोलिसांना दोषी धरण्यात आलं आहे. मजिस्ट्रेटने बनवलेला अहवाल कोर्टात सादर करण्यात आला. आज न्यायाधीश रेवती मोहिते आणि न्यायाधीश नीला गोखले यांनी मॅजिस्ट्रेटच्या अहवालाचा आढावा घेतला.

Akshay Shinde Encounter Case :  मोठी बातमी, अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात कोर्टाने पोलिसांना ठरवलं दोषी
akshay shindeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 20, 2025 | 1:57 PM

एक मोठी बातमी आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना जबाबदार धरलं आहे. पाच पोलिसांना हायकोर्टाने दोषी ठरवलं आहे. त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. बदलापुरात शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक शोषण प्रकरणात अक्षय शिंदे आरोपी होता. ठाण्यातील मॅजिस्ट्रेटने बंद लिफाफ्यातून चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयाला सादर केला. फॉरेन्सिकच्या अहवालात बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिन्टस आढळले नाहीत असं म्हटलं आहे. पाच पोलीस अधिकार्‍यांविरुद्ध फौजदारी खटला चालणार आहे. मॅजिस्ट्रेटचा अहवाल मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आला. अक्षय शिंदेला दुसऱ्या प्रकरणात तळोजा कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या तुरुंगात नेत असताना वाटते एन्काऊंटरमध्ये त्याचा मृत्यू झाला होता. अक्षयने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी स्वसंरक्षणार्थ केलेल्या कारवाईत अक्षय मारला गेला असं पोलिसांचा दावा होता. पण तो कोर्टात टिकला नाही.

“स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला हे पोलिसांच म्हणण पटणार नाही. हे संशयास्पद आहे” असं न्यायालयीन चौकशीच्या अहवालात म्हटलं आहे. कायद्यानुसार योग्य ती कारवाई करू अशी सरकारी वकिलांनी कोर्टात माहिती दिली. “ही बनावट चकमक आहे असं आमच म्हणणं होतं. त्यासाठी गुन्हा दाखल करावा. न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास व्हावा अशी आमची मागणी होती” असं अक्षय शिंदेच्या आई-वडिलांच्या वतीने खटला लढणाऱ्या वकिलाने सांगितलं. “ही बनावट चकमक असून एकप्रकरची हत्या आहे हे मॅजिस्ट्रेटच्या अहवालातून समोर आलं आहे. आता पुढच्या कारवाईवर आमच लक्ष असेल” असं अक्षय शिंदेच्या आई-वडिलांचे वकील अमित कटारनवरे म्हणाले. आज न्यायाधीश रेवती मोहिते आणि न्यायाधीश नीला गोखले यांनी मॅजिस्ट्रेटच्या अहवालाचा आढावा घेतला. पोलीस व्हॅनमध्ये असताना अक्षयने बंदूक खेचून घेतली. गोळीबार केला. त्यात एक पोलीस जखमी झाला. त्यावेळी स्वसंरक्षणार्थ आम्हाला गोळीबार करावा लागला असं पोलिसांच म्हणणं होतं.

जबाबदार पोलीस अधिकारी

संजय शिंदे (पीआय) निलेश मोरे (उपनिरीक्षक) हरिश तावडे (हवालदार) अभिजीत मोरे (हवालदार)

बदलापूरची जनता रस्त्यावर उतरलेली

बदलापूच्या शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे मुख्य आरोपी होता. या घटनेनंतर बदलापूरकराच्या मनातील आक्रोश, संताप समोर आला होता. बदलापूरची जनता रस्त्यावर उतरली होती. अनेक तास रेल रोको आंदोलन करण्यात आलं होतं. मागच्यावर्षीची ऑगस्ट महिन्यातील ही घटना आहे. लोकांचा संताप लक्षात घेऊन कोर्टाने स्वत:हून याचिका दाखल करुन घेत काही पावल उचलली होती.

ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम
ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम.
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच.
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'.
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट.
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर.
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल.
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द.
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं.
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी.
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार.