दारु पिऊन दररोज आईला मारहाण करायचा, संतापलेल्या मुलाने अखेर पाऊल उचलले !

बाप दररोज घरी दारु पिऊन यायचा. यानंतर दारुच्या नशेत आईला मारहाण करत छळ करायचा. आईचा रोजचा त्रास पाहून अखेर मुलाला संताप अनावर झाला आणि पुढे अनर्थ घडला.

दारु पिऊन दररोज आईला मारहाण करायचा, संतापलेल्या मुलाने अखेर पाऊल उचलले !
घरगुती वादातून मुलाने बापाला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 24, 2023 | 12:56 PM

अंबरनाथ / निनाद करमरकर : दारुड्या बापाच्या त्रासाला कंटाळून मुलाने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये उघडकीस आली आहे. दारु पिऊन बाप दररोज आईला मारहाण करायचा, तसेच मानसि छळही करायचा. मुलाला आईचा त्रास पहावत नव्हता. त्यामुळे मुलाने बापाच्या जाचातून आईची सुटका करण्यासाठी बापाची हत्या केली. अंबरनाथमधील बुवापाडा परिसरात ही धक्कादायक घटना घडली. राजेश वर्मा असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. प्रकाश वर्मा असे आरोपी मुलाचे नाव आहे.

बाप दारु पिऊन आईला मारहाण करायचा

अंबरनाथ पश्चिमेच्या बुवापाडा परिसरात राजेश वर्मा हा त्याची पत्नी अनिता आणि 19 वर्षांचा मुलगा प्रकाश याच्यासह वास्तव्याला होता. राजेशला दारूचं व्यसन होतं. त्यातूनच नवरा बायकोमध्ये सतत वाद व्हायचे. तसेच राजेश हा पत्नी अनिताला मारहाणही करत होता. ही बाब मुलगा प्रकाश याला खटकत असल्याने प्रकाश आणि राजेश यांच्यातही वाद होत होते.

आईला मारहाण करताना पाहून मुलाला संताप अनावर झाला

रविवारीही नेहमीप्रमाणे राजेश हा दारू पिऊन घरी आला आणि पत्नी अनिताला मारहाण करत होता. यावेळी मुलगा प्रकाश याने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही तो ऐकतच नव्हता. पत्नीला मारहाण करतच होता. अखेर संतापलेल्या प्रकाशने घरातील चाकू घेऊन राजेश याच्या छातीत खुपसला. या घटनेत राजेश याचा मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

पोलिसांकडून आरोपी मुलाला अटक

अंबरनाथ पश्चिम पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. तर पत्नी अनिता वर्मा हिच्या फिर्यादीवरून मुलगा प्रकाश वर्मा याच्याविरोधात पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.