बदलापुरात तरुणाची तीन पाळीव कुत्र्यांसह आत्महत्या, कारण वाचून तुम्हीही हादराल!

एका तरुणाने तीन पाळीव कुत्र्यांसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Badlapur Youth Suicide With three dogs)

बदलापुरात तरुणाची तीन पाळीव कुत्र्यांसह आत्महत्या, कारण वाचून तुम्हीही हादराल!
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 10:42 AM

बदलापूर : एका तरुणाने तीन पाळीव कुत्र्यांसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बदलापुरातील एका ठिकाणी ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांना एक सुसाईड नोट आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. (Badlapur Youth Suicide With three dogs)

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बदलापूर पश्चिमेच्या रितू वर्ल्ड सोसायटी आहे. या सोसायटीत संध्याकाळी 5 च्या सुमारास ही घटना घडली. या सोसायटीत सत्यप्रीत चॅटर्जी हा तरुण C विंगमध्ये सातव्या मजल्यावर भाड्याने राहत होता. चॅटर्जी हा प्राणीमित्र होता. त्यामुळे त्याने घरात एक मोठा कुत्रा आणि कुत्र्याची दोन लहान पिल्लं पाळली होती.

शुक्रवारी संध्याकाळी अचानक त्याच्या घरातून धूर येऊ लागला. त्यामुळे त्याच्या सोसायटीतील रहिवाशांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाने त्याच्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी सत्यप्रीत चॅटर्जी याच्यासह तीन कुत्रे पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे चॅटर्जी याने स्वत:ला बेडरुममध्ये पेटवून घेतलं. तसेच पेटवून घेण्यापूर्वी त्याने दरवाजा उघडला जाऊ नये, यासाठी बेडरूमच्या दरवाजाला कपाट टेकवून ठेवलं होतं.

सुसाईड नोटमध्ये धक्कादायक माहिती

या प्रकारानंतर बदलापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या तपासादरम्यान पोलिसांना एक सुसाईड नोट आढळून आली. ज्यात बायको आणि मुलं सोडून गेल्यानं नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

मात्र चॅटर्जीने स्वतः आत्महत्या करताना निष्पाप मुक्या जनावरांचा जीव का घेतला? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तसेच याप्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरु केल्याची माहिती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांनी दिली.  (Badlapur Youth Suicide With three dogs)

संबंधित बातम्या : 

मनसुख हिरेन यांच्या वकिलाची NIA चौकशी, वाझेंनीच अ‍ॅड. गिरींशी ओळख करुन दिल्याचा पत्नी विमलांचा दावा

दीड वर्षाच्या चिमुकलीला कवेत घेऊन महिलेची विहिरीत उडी, चप्पल तरंगताना दिसल्याने थरारक घटना समोर

VIDEO | शिवसेना पदाधिकाऱ्याचा प्रेयसीच्या घरी गळफास, चंद्रकांत खैरेंची महिला पोलीस निरीक्षकाशी खडाजंगी

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.