AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Crime : दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर बंदुकांनी भरलेल्या बॅगा जप्त, व्हिएतनामहून आलेल्या जोडप्याला अटक

हे जोडपे व्हिएतनामहून दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. विमानतळावर तपासणी करताना त्यांच्याकडील बॅगांमध्ये बंदुका आढळल्या. दोन ट्रॉली बॅग या जोडप्याकडे होत्या. या दोन्ही बॅगांमध्ये मिळून 45 बंदुका होत्या.

Delhi Crime : दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर बंदुकांनी भरलेल्या बॅगा जप्त, व्हिएतनामहून आलेल्या जोडप्याला अटक
दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर बंदुकांनी भरलेल्या बॅगा जप्तImage Credit source: TV9
| Updated on: Jul 13, 2022 | 6:00 PM
Share

दिल्ली : व्हिएतनामहून आलेल्या एका भारतीय जोडप्याला बंदुकां (Guns)सह दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (Indira Gandhi International Airport)वर अटक (Arrest) करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन ट्रॉली बॅगमधून 22 लाख रुपये किंमतीच्या 45 बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. याआधी 12 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 25 बंदुकांच्या तस्करीत त्यांचा पूर्वीचा सहभाग असल्याचे कबूल केले असल्याचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जनरलच्या सीमाशुल्क आयुक्तांनी सांगितले. सीमाशुल्क विभागाने या जोडप्याला अटक केले असून पुढील कारवाई करत आहेत.

दोन ट्रॉली बॅगांतून 45 बंदुका जप्त

बॅलेस्टिक्स अहवालानंतर या बंदुका खऱ्या आहेत की नकली ते स्पष्ट होईल, असे कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या जोडप्याची अद्याप कळू शकली नाही. हे जोडपे व्हिएतनामहून दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. विमानतळावर तपासणी करताना त्यांच्याकडील बॅगांमध्ये बंदुका आढळल्या. दोन ट्रॉली बॅग या जोडप्याकडे होत्या. या दोन्ही बॅगांमध्ये मिळून 45 बंदुका होत्या. कस्टम विभागाने या बंदुका जप्त केल्या आहेत. या जोडप्याने व्हिएतनाममधून या बंदुका कुणाकडून घेतल्या आणि भारतात कोणाला ही शस्त्र सुपूर्द करणार होते, याबाबत कस्टम अधिकारी चौकशी करत आहेत. तसेच एवढ्या प्रमाणावर शस्त्र घेऊन हे जोडपे व्हिएतनाममधून भारतापर्यंत कसे पोहचले.

कस्टम अधिकाऱ्यांकडून जोडप्याची कसून चौकशी सुरु

हे जोडपे मूळचे कुठले आहे ? व्हिएतनाममधून भारतात एवढा शस्त्रसाठा आणण्यात यशस्वी कसे झाले ? त्यांनी व्हिएतनामच्या विमानतळावर सुरक्षा अधिकाऱ्यांना कसे चकवले ? विमानतळावर देखील तपासात अधिकाऱ्यांना या बंदुका कशा आढळल्या नाहीत ? तसेच या बंदुका खऱ्या आहेत की खोट्या या सर्व बाबींचा तपास करत आहेत. कस्टम अधिकारी दोघा पती-पत्नीची चौकशी करत आहेत. (Bags loaded with guns were seized from a couple from Vietnam at Delhi International Airport)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.