बाळासाहेब थोरात यांच्या कन्येचे बनावट फेसबुक अकाऊण्ट, डॉ. जयश्री थोरातांच्या नावे पैशाची मागणी

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते उघडण्यात आले आहे. (Balasaheb Thorat Daughter Fake account)

बाळासाहेब थोरात यांच्या कन्येचे बनावट फेसबुक अकाऊण्ट, डॉ. जयश्री थोरातांच्या नावे पैशाची मागणी
बाळासाहेब थोरात आणि कन्या जयश्री थोरात
Follow us
| Updated on: Mar 04, 2021 | 10:18 AM

शिर्डी : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या कन्येच्या नावाने बनावट फेसबुक खाते उघडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉ. जयश्री थोरात (Jayashree Thorat) यांच्या नावे फेसबुक युजर्सकडून पैशांची मागणी केली जात आहे. या प्रकरणी अहमदनगरमध्ये पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Balasaheb Thorat Daughter Jayashree Thorat Fake Facebook account)

फोटोचा गैरवापर करुन बनावट खाते

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते उघडण्यात आले आहे. फेसबुक पेजवर बाळासाहेब थोरात आणि डॉ. जयश्री थोरात यांच्या फोटोचा गैरवापर करण्यात आला आहे. या फेसबुक अकाऊण्टच्या माध्यमातून जयश्री थोरात यांच्या नावाखाली अज्ञात व्यक्तीकडून पैशांची मागणी झाल्याचा आरोप आहे.

गूगल पेद्वारे पैशांची मागणी

अहमदनगरमधील संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब थोरात यांचे सुपुत्र सिद्धार्थ थोरात यांनी पोलिसात तक्रार दिली. गूगल पे आणि फोन पे द्वारे जयश्री थोरात यांच्या मित्र यादीतील व्यक्तींकडून पैशांची मागणी केली जात आहे.

कोण आहेत डॉ. जयश्री थोरात?

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात या कॅन्सर तज्ञ आहेत. सध्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये त्या कॅन्सरतज्ञ म्हणून कार्यरत आहेत. कोरोनाच्या संकटकाळात त्यांनी रुग्णांची झोकून देत सेवा केली.

एकविरा फाऊंडेशनची स्थापना

“एकविरा फाउंडेशन”च्या माध्यमातून संगमनेरात सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य तपासणी, समाजातील दुर्बल घटकांसाठी विविध उपक्रम डॉ. जयश्री थोरात यांनी राबवले आहेत. महिला-युवतींसाठी एकविरा फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. (Balasaheb Thorat Daughter Jayashree Thorat Fake Facebook account)

महिला व युवतीसाठी करिअर मार्गदर्शन, स्नेह मेळावे, चर्चा सत्रे, मार्गदर्शन शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबिरे, वंचित व दुर्बल घटक यांना विविध साहित्य वाटप यासारख्या कामातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.

साध्या स्वभावाची ख्याती

सरळ, साधा स्वभाव, कोणताही बडेजाव नाही, प्रत्येक युवती व महिलांची बारकाईने काळजी घेणाऱ्या जयाताई अशी त्यांची ख्याती आहे. संपूर्ण संगमनेर तालुक्यात कमी वयातच प्रत्येकाच्या घरात त्यांनी वेगळे स्थान निर्माण केले आहे. डॉ. जयश्री थोरात यांचा डिसेंबर 2020 मध्ये डॉ. हसमुख यांच्यासोबत साखरपुडा झाला. छोटेखानी कौटुंबिक कार्यक्रमात वाङनिश्चय झाल्यानंतर दोघंही विवाहबद्ध होतील.

संबंधित बातम्या :

बाळासाहेब थोरातांच्या गावातच काँग्रेसला मोठा धक्का; विखे-पाटलांनी डाव साधला

बाळासाहेब थोरात भाजपात प्रवेश करणार होते, कुणाकुणाला भेटले याची सर्व माहिती, विखेंचा दावा

(Balasaheb Thorat Daughter Jayashree Thorat Fake Facebook account)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.