AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“पूजा चव्हाणच्या आत्महत्येचं दुःख, पण बंजारा समाजाची बदनामी थांबवा”

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात बंजारा समाजाची होणारी बदनामी थांबवावी, असं आवाहन ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर पवार यांनी केले. (Banajra defamation Pooja Chavan Suicide)

पूजा चव्हाणच्या आत्महत्येचं दुःख, पण बंजारा समाजाची बदनामी थांबवा
पूजा चव्हाण
| Updated on: Feb 14, 2021 | 7:50 AM
Share

भिवंडी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी (Pooja Chavan Suicide Case) बंजारा समाजाची बदनामी थांबवावी, म्हणून अखिल भारतीय बंजारा सेवा संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आवाहन केलं आहे. शिवसेना नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचं नाव समोर आल्यानंतर गदारोळात संपूर्ण समाजाची बदनामी होत आहे, अशी खंत शंकर पवार यांनी व्यक्त केली. (Banajra Community demands to stop defamation in Pooja Chavan Suicide Case)

“बंजारा समाजाची बदनामी थांबवा”

बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या युवतीच्या आत्महत्येनंतर मंत्री संजय राठोड यांचे नाव चर्चेत आले. परंतु या गदारोळात बंजारा समाजाची बदनामी होत आहे. पूजा चव्हाणच्या मृत्यूमुळे सर्व समाज हळहळला आहे. त्याचं दुःखही समाजाला आहे. परंतु त्या गदारोळात संपूर्ण समाजाची बदनामी होत आहे. बंजारा समाजाची बदनामी थांबवावी असं आवाहन ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर पवार यांनी एका व्हिडीओद्वारे केले आहे.

“संजय राठोड यांच्याशी प्रकरण जोडू नका”

व्हायरल ऑडिओ क्लिपनुसार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांच्याशी जोडणं योग्य नाही. याची सखोल चौकशी व्हावी आणि नंतर कारवाई करावी. तसेच पूजा चव्हाणला सरकार तपास करुन योग्य न्याय देईल, मात्र तत्पूर्वी बंजारा समाजाला बदनाम करु नयेअसे आवाहन वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील संत रामराव महाराज यांचे नातू धर्मपीठाधीश्वर बाबूसिंग महाराज यांच्या चिरंजीवांनी व्यक्त केले आहे.

नेमकं प्रकरण काय?

मूळ बीड जिल्ह्यातील परळीच्या पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी ती भावासोबत पुण्यात राहत होती. तिने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. यानंतर राज्यातील एका कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याने विरोधक आक्रमक झाले. या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या.

भाजपकडून संजय राठोड यांचे नाव

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली. त्यानंतर भाजपने थेट शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेत राजीनाम्याची मागणी केली. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या मुसक्या आवळून कारवाई करण्याची मागणी केली. याशिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहून सखोल चौकशी करण्याची विनंती केली आहे.

पोस्टमार्टम अहवालात काय?

पोलिसांच्या पंचनाम्यानुसार पूजाने नैराश्यातून आत्महत्या केली. तर पूजाच्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करून तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी शवविच्छेदन अहवालातील मोजकीच माहिती मीडियाला दिली आहे. (Banajra Community demands to stop defamation in Pooja Chavan Suicide Case)

त्या दोन व्यक्तींबाबत मौन

पूजाने आत्महत्या केली. तेव्हा तिच्या सोबत घरात दोन व्यक्ती होते. पोलिसांनी त्या दोन व्यक्तिंबाबत मौन पाळलं आहे. त्यांच्याविषयी काहीही माहिती दिली नाही. या दोन व्यक्तींची चौकशी केल्यानंतर त्यातून काय माहिती समोर आली हे पोलिसांनी स्पष्ट केलं नाही.

लॅपटॉप, मोबाईलबाबत भाष्य नाही

पूजाचा लॅपटॉप आणि मोबाईल बाबतही पोलिसांनी काहीच माहिती दिली नाही. पूजाचा लॅपटॉप आणि मोबाईल जमा केला का? त्याची तपासणी केली का? त्यातून काही माहिती आली का? ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख होत असलेला मोबाईल आणि लॅपटॉप कुठे आहे? याबाबतही पोलिसांनी काहीच माहिती दिली नाही. शिवाय ऑडिओ क्लिपमधील संभाषणाबाबत आणि त्यानुषंगाने करण्यात आलेल्या तपासाबाबतही पोलिसांनी मौन पाळलं आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासावरच संशय निर्माण होत आहे.

संबंधित बातम्या : 

भाऊ, पूजा ताई र आत्महत्या छ कि घात पात हाई?; फेसबुकवर राठोडांना नेटकऱ्यांचा सवाल

कोण आहे अरुण राठोड? जो सातत्यानं पूजा आणि मंत्र्यांच्या संपर्कात होता?

(Banajra Community demands to stop defamation in Pooja Chavan Suicide Case)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.