AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CRIME NEWS : बारमध्ये काम करणाऱ्या महिलेच्या प्रेमात लेफ्टनंट कर्नल, ज्यावेळी बदली झाली त्यावेळी मात्र….

Lieutenant colonel : डान्सबारमध्ये काम करणाऱ्या महिलेच्या प्रेमात पडलेल्या एका लेफ्टनंट कर्नलची बदली झाल्यानंतर वाईट अवस्था झाली. त्यामुळे तो त्या महिलेला बदलीच्या ठिकाणी घेऊन गेला. त्यानंतर मात्र सगळ्यांना धक्का बसला.

CRIME NEWS : बारमध्ये काम करणाऱ्या महिलेच्या प्रेमात लेफ्टनंट कर्नल, ज्यावेळी बदली झाली त्यावेळी मात्र....
Bar Dancer Murdered In Dehradun Lieutenant Colonel Arrested Crime Uttarakhand News In marathiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 12, 2023 | 8:52 AM
Share

नवी दिल्ली : रविवारी एका महिलेचा (Dance baar Woman murder) मृतदेह कुचलेल्या अवस्थेत आढळून आला. ज्यावेळी ही माहिती पोलिसांना समजली, त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी (Dehradun Lieutenant Colonel Arrested) या घटनेचा २४ तासाच्या आत छडा लावला असल्याचं पाहायला मिळालं आहे. ती महिला मुळची नेपाळची असल्याचे एका हिंदी वेबसाईटने सांगितले आहे. त्या महिलेच्या हत्या करणारा व्यक्ती दुसरा कुणी नसून लेफ्टनंट कर्नल (Lieutenant colonel) असल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे. हे प्रकरण उत्तराखंड राज्यातील देहरादून राजधानीतील असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी एक पथक तयार केलं आहे.

तीन वर्षे दोघांच्यात प्रेम संबंध

हे संपूर्ण प्रकरण प्रेम प्रकरणातील आहे. त्या डान्सबारमध्ये काम करणाऱ्या महिलेचं नाव श्रेया असं आहे. ती महिला लेफ्टनंट कर्नलला सिलिगुडीला एका बारमध्ये भेटली होती. त्यानंतर तीन वर्षे दोघांच्यात प्रेम संबंध होते. ज्यावेळी त्या लेफ्टनंट कर्नलची बदली देहरादूनला झाली. त्यावेळी तो त्या डान्सबार श्रेयाला घेऊन देहरादूनला आला. विशेष म्हणजे त्या लेफ्टनंट कर्नलने त्या महिलेसाठी एक घर सुध्दा खरेदी केलं होतं.

हातोड्याने तिच्या डोक्यात वार केले

लेफ्टनंट कर्नलचं नाव रमेंदु उपाध्याय असं आहे. ज्यावेळी पोलिसांनी त्यांची चौकशी केली, त्यावेळी त्यांनी श्रेया सारखी पत्नीचं स्थान देण्यावरुन त्रास देत होती. त्यामुळे लेफ्टनंट कर्नल यांनी तिची हत्या केली आहे. लेफ्टनंट कर्नल यांनी राजपुर रोड येथील एका कल्बमध्ये तिचा दारु पाजली, त्यानंतर एका दुसऱ्या रस्त्यावर आले. त्यावेळी हातोड्याने तिच्या डोक्यात वार केले. हातोड्याने अधिक वार केल्यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याचं पोलिसांनी जाहीर केलं आहे.

महिलेची ओळख पटवण्यात अधिक अडचण

पोलिसांनी लेफ्टनंट कर्नलचं नाव रमेंदु उपाध्याय यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक केली आहे. पोलिसांनी ज्यावेळी त्यांची चौकशी केली, त्यावेळी त्यांनी गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांना त्या महिलेची ओळख पटवण्यात अधिक अडचण झाली होती. कारण ती सिलीगुड़ी येथील रहिवासी होती.

नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी.
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.