Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू, रिक्षा आणि इनोव्हाची समोरासमोर धडक

या अपघातात दोन गंभीर झाल्याचीही माहिती समोर आली आहे. या जखमींवर अंबाजोगाईच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या अपघातात मृत पावलेल्यांमध्ये दोन बालकांचाही समावेश आहे.

Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू, रिक्षा आणि इनोव्हाची समोरासमोर धडक
बीडमध्ये भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू,Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 8:24 PM

बीड: केज-अंबाजोगाई रस्त्यावर भीषण अपघात (Beed Accident) झालाय. या अपघातात तब्बल 6 जणांचा (Beed Accident death) जागीच मृत्यू झालाय. ऍपेरिक्षा आणि इनोव्हाची (Innova) समोरसासमोर धडक झाली आहे. या अपघातात दोन गंभीर झाल्याचीही माहिती समोर आली आहे. या जखमींवर अंबाजोगाईच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या अपघातात मृत पावलेल्यांमध्ये दोन बालकांचाही समावेश आहे. काही तासांपूर्वीचीच नाशिकमधील भीषण अपघाताची घटना ताजी असतानाच ही आणखी एक मोठ्या अपघाताची घटना घडली आहे. त्यामुळे आज दिवस हा भीषण अपघातांचा  ठरला आहे. रोडवरील अपघातांनी आज अनेक जणांचा जीव घेतला आहे. त्यामुळे राज्यभर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हे अपघात आता प्रशासनाचीही डोकेदुखी ठरु लागले आहेत. हे अपगात रोखण्याचं आव्हान आता प्रशासनासमोर असणार आहे.

अपघाताचे काही भीषण फोटो

गाड्यांचेही मोठं नुकासान

हे अपघाताचे फोटो पाहिल्यास हा अपघात किती भीषण आहे. हे सहज लक्षात येतं. यात ही धडक झाल्यानंतर इनोव्हा गाडी रस्त्याच्या बाजुला जात आजुबाजुच्या झुडपात घुसली आहे. तर दुसरी गाडीही समोरुन आणि साईडवरून पूर्ण फुटली आहे. धडक झाल्यानंतर ही गाडीही धडकेने रस्त्यावरून बाहेर गेल्याचे दिसून येते. या अपघातानंतर काही काळ मृतदेह हे रस्त्यावर ठेवल्याचे दिसून आलं आहे. तर जखमींना तात्काळ रुग्णालयात पाठवण्यात आलं. मात्र यातील काही जणांना रुग्णालयात पोहचण्याच्या आधी प्राण सोडले होते. यात दोन लहान मुलांचाही समावेश असल्याने जास्त हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

अपघातानंतर बघ्यांची गर्दी

या अपघातानंतर रस्त्यावरही मोठी गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. अपघातानंतर काही लोक मदतीसाठी तात्काळ धावले. तर काही बघ्यांनीही यावेळी गर्दी केली आहे. रस्त्यावर रक्त सांडल्याचे समोर आलेल्या काही फोटो आणि व्हिडिओतून दिसून येत आहे. रस्त्यावरचा वेग कधी कधी किती नडतो, हेच दाखवणारा हा अपघात आहे. एका अपघाताने अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. त्यामुळे वेळीच वेगावर नियंत्रण ठेवून असे विपरीत प्रकार टाळणे गरजेचे असते.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.