म्हशीवर करणी केल्याचा समज, बीडमध्ये चिमुकल्याची हत्या, भावकीतील दाम्पत्य अटकेत

जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात खेळण्यासाठी गेलेल्या 6 वर्षीय शुभमच्या संशयास्पद मृत्यूने बीडमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. (Beed Couple kills child )

म्हशीवर करणी केल्याचा समज, बीडमध्ये चिमुकल्याची हत्या, भावकीतील दाम्पत्य अटकेत
Follow us
| Updated on: Feb 05, 2021 | 10:11 AM

बीड : म्हशीवर करणी केल्याच्या समजातून सहा वर्षांच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. बीडमध्ये झालेल्या चिमुकल्याच्या संशयास्पद मृत्यूमुळे काही दिवसांपूर्वी एकच खळबळ उडाली होती. हत्येप्रकरणी चिमुरड्याच्या भावकीतील दाम्पत्यालाच अटक करण्यात आली आहे. (Beed Couple kills relatives child out of superstition)

शुभम उर्फ राज सपकाळ हा बालक मृतावस्थेत आढळला होता. बहिणीसोबत जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात खेळण्यासाठी गेलेल्या 6 वर्षीय शुभमच्या संशयास्पद मृत्यूने बीडमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. घाटना नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रत्नागिरी या गावात ही घटना घडली होती.

शाळेच्या जवळच आरोपी राहत असल्याने त्यांनी शुभमला घरी नेले आणि त्याची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह गोणीत घालून शाळेजवळ फेकला.

म्हशीवर करणी केल्याची अंधश्रद्धा

म्हशीवर करणी केल्याचा राग मनात धरुन दाम्पत्याने शुभम सकपाळची हत्या केल्याचा आरोप आहे. घाटना नेकनूर पोलिसांनी शुभमच्या भावकीतील पती पत्नीला आता बेड्या ठोकल्या आहेत.

गोंदियात बापाने चिमुकलीला संपवलं

खाऊसाठी पाच रुपये मागितल्याने वडिलांनी पोटच्या मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गोंदियात उघडकीस आली आहे. जन्मदात्याने 20 महिन्यांच्या मुलीचा दरवाजावर आपटून जीव घेतला. आरोपी पित्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.  (Beed Couple kills relatives child out of superstition)

नेमकं काय घडलं?

28 वर्षीय विवेक उईके हा तरुण मंगळवारी (दोन फेब्रुवारी) संध्याकाळी कामावरुन घरी परत आला. त्यावेळी त्याची पावणेदोन वर्षांची मुलगी वैष्णवी रडत होती. विवेकची पत्नी अर्थात चिमुकलीची आई वर्षा उईके हिने मुलीला खाऊ घेऊन देण्यासाठी पतीकडे पाच रुपये मागितले. त्यामुळे विवेकच्या संतापाचा पारा चढला. रागाच्या भरात त्याने मुलीला उचललं आणि घरातील दरवाजावर जोराने आपटलं.

आईची तक्रार, पित्याला अटक

वैष्णवीच्या डोक्याला गंभीर इजा झाली. तिला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी वैष्णवीला मृत घोषित केलं. त्यानंतर आईने तिरोडा पोलीस स्थानकात पतीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी पिता विवेक उईके याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध मुलीच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

रडणाऱ्या चिमुकलीसाठी आईने पाच रुपये मागितले, बापाने दरवाजावर आपटल्याने मुलीचा मृत्यू

मॉर्निंग वॉकला गेल्या अन् परतल्याच नाहीत, जालनामधून सावध करणारी बातमी!

(Beed Couple kills relatives child out of superstition)

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.