AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीड कारागृहातील मारहाण प्रकरणानंतर तुरुंग प्रशासनाचा मोठा निर्णय, चार आरोपींना थेट…

Beed jail beating case: वाल्मिक कराड, सुदर्शन घुले यांनी आम्हाला धमकवले. या प्रकरणाची सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावी, अशी मागणी महादेव गित्ते याने केली. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीनंतरच सत्य समोर येणार आहे.

बीड कारागृहातील मारहाण प्रकरणानंतर तुरुंग प्रशासनाचा मोठा निर्णय, चार आरोपींना थेट...
महादेव गित्तेसह इतर आरोपींना दुसऱ्या कारागृहात हलवले
Follow us
| Updated on: Mar 31, 2025 | 5:10 PM

Beed Jail Beating Case: राज्यातील बीड जिल्हा सध्या चर्चेचे केंद्र बनला आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर या प्रकरणाचा तपासावरुन राज्यभर रान पेटले होते. या हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड असलेल्या वाल्मिक कराड याला अटक झाली. त्यानंतर त्याच्यासह इतर आरोपींना बीड कारागृहात ठेवण्यात आले होते. सोमवारी बीड कारागृहात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याची बातमी समोर आली. बबन गित्ते याचा सहकारी असलेल्या महादेव गित्ते याने ही मारहाण केल्याचे सांगितले जात होते. परंतु तुरुंग प्रशासनाने कराड अन् घुले यांना मारहाण झाल्याचे वृत्त फेटाळले आहे. मात्र सोनवणे आणि गित्ते यांच्यात मारहाण झाल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आता महादेव गित्तेसह चार आरोपींनी बीड कारागृहातून हलवण्यात आले आहे.

नेमके काय घडले?

महादेव गित्तेसह चार आरोपींना बीड जिल्हा कारागृहातून छत्रपती संभाजीनगरमधील हर्सुल कारागृहात हलवण्यात आले. सोमवारी सकाळी ९.३० वाजता मारहाणीचा झालेल्या प्रकरणानंतर तुरुंग प्रशासनाने हा निर्णय घेतला. मकोकातील आरोपी आणि इतर आरोपी नाश्त्याच्या वेळी एकत्र आले. दोन गट आमनेसामने आल्यावर त्यांच्यात बाचाबाची झाली. त्याचे रुपांतर मारहाणीत झाले. सोनवणे गट आणि महादेव गित्ते यांच्या गटात ही मारहाण झाली. परंतु वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाली नाही, असे तुरुंग प्रशासनाने पत्र काढून स्पष्ट केले आहे. या दोन्ही गटांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

महादेव गित्तेचा थेट कराडवर आरोप

कारागृहातून महादेव गित्ते याला छत्रपती संभाजीनगरमधील हर्सुल कारागृहात नेण्यात येत होते. त्यावेळी पोलीस बंदोबस्तात असलेल्या महादेव गित्ते याने माध्यमांशी संवाद साधला. जोरजोरात बोलत तो म्हणाला, वाल्मिक कराड, सुदर्शन घुले यांनी आम्हाला धमकवले. या प्रकरणाची सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावी, अशी मागणी त्याने केली.

दरम्यान, या प्रकरणानंतर बीडमधील कारागृहात सर्वच काही सुरळीत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. संतोष देशमुख हत्येतील आरोपी बीड कारागृहात असलेल्यामुळे हे प्रकरण संवेदनशील झाले आहे.

हे ही वाचा…

‘अंदर मारना, या मरना…’ वाल्मिक कराड मारहाणीनंतर आरोपीची फेसबुक पोस्ट, कोण आहे तो आरोपी?

भारतात उद्या युद्धाचा सायरन वाजणार, आशियाई देशाचं मॉक ड्रिलकडे लक्ष
भारतात उद्या युद्धाचा सायरन वाजणार, आशियाई देशाचं मॉक ड्रिलकडे लक्ष.
आमच्या हाती काय बंदुका देणार? मॉक ड्रिलवरून राऊतांचा सरकारला खोचक सवाल
आमच्या हाती काय बंदुका देणार? मॉक ड्रिलवरून राऊतांचा सरकारला खोचक सवाल.
देशव्यापी मॉक ड्रिल, आपत्कालीन परिस्थितीत कराल? तज्ज्ञांनी सांगितलं...
देशव्यापी मॉक ड्रिल, आपत्कालीन परिस्थितीत कराल? तज्ज्ञांनी सांगितलं....
भारतासोबत युद्ध झालं तर अवघ्या 100 तासांत पाकिस्तानचे 5 तुकडे, कारण...
भारतासोबत युद्ध झालं तर अवघ्या 100 तासांत पाकिस्तानचे 5 तुकडे, कारण....
चोरीला गेलेलं बाळ सुखरूप आईच्या कुशीत, पोलिसांकडून 48 तासात शोध अन्...
चोरीला गेलेलं बाळ सुखरूप आईच्या कुशीत, पोलिसांकडून 48 तासात शोध अन्....
युद्धाची पूर्व तयारी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश; 7 मे रोजी...
युद्धाची पूर्व तयारी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश; 7 मे रोजी....
पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय
पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय.
मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी
मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी.
वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले...
वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले....
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.