‘तो मेला तर विम्याचे 1 कोटी मिळतील! 10 लाख तुमचे 90 माझे’ बीडमध्ये पत्नीनेच रचलं हत्याकांड

Beed wife killed husband Murder news : एक अपघात झाला होता. या अपघातामध्ये टेम्पो आणि दुचाकी धडकली आणि पतीचा मृतदेह रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत आढळून आला होता.

'तो मेला तर विम्याचे 1 कोटी मिळतील! 10 लाख तुमचे 90 माझे' बीडमध्ये पत्नीनेच रचलं हत्याकांड
बीडमध्ये खळबळ..Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 2:11 PM

बीड : नवरा-बायकोच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक (Beed Murder Mystery) घटना उघडकीस आली आहे. पतीच्या विम्याचे एक कोटी रुपये मिळावेत, यासाठी पत्नीनेच पतीच्या हत्येचा (Wife killed husband) कट रचलाय. यासाठी तिने पतीच्या हत्येची सुपारी दिली होती. बीडमध्ये ही खळबळजनक घटना उघडकीस आलीय. या घटनेनं अख्खं बीड (Beed crime news) हादरलंय. डोक्यात वार करुन पतीची हत्या करण्यात आली होती. पण अपघातामध्ये तो दगावला, असा बनाव रचला गेला होता. संशयास्पद घडामोडींनंतर पोलिसांनी या संपूर्ण मर्डर मिस्ट्रीचा उलगडा केलाय. यानंतर पत्नीलाही पोलिसांनी अटक केली. त्यानंतर पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना पत्नींही पतीच्या हत्येची सुपारी दिली असल्याचा कबुली जबाब दिलाय. पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी याबाबत माहिती देत हत्येचा खुलासा केलाय.

मर्डर मिस्ट्री उलगडली

बीड ग्रामीण पोलिसांनी उलगडलेल्या हत्याकांडानं संपूर्ण बीडमध्ये खळबळ उडाली. एक अपघात झाला होता. या अपघातामध्ये टेम्पो आणि दुचाकी धडकली आणि पतीचा मृतदेह रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत आढळून आला होता. ही घडना कळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केला. पण त्यानंतर पोलिसांनी संशय आला म्हणून त्यांनी तपासाची सगळी चक्र फिरवली.

पत्नीसह 5 जणांना अटक

पोलिसांनी केलेल्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली. रस्त्यावर आढळलेल्या मृतदेहाची हत्या करण्यात आलेली. मृतदेहाच्या डोक्यावर गंभीर वार करण्यात आले होते. डोक्यात वर करुन या इसमाचा मृतदेह रस्त्यावर फेकण्यात आल होता. त्यानंतर टेम्पो आणि दुचाकीची धडक होऊन अपघात झालाय, असा बनाव रचला गेला होता. याप्रकऱणी पोलिसांनी एकूण पाच जणांना अटक केली. त्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये पत्नीचाही समावेश आहे. 11 जून रोजी पिंपरगव्हाण रोड वर एका व्यक्तीचं प्रेत आढळून आलं होतं. हा मृतदेह मंचक पवार यांचा असल्याचं निष्पन्न झालेलं. या खूनाचा उलगडा झाल्यानंतर खळबळजनक माहिती समोर आली. एक कोटी रुपयांचा विमा पदरात पाडून घेण्यासाठी मृत पवार यांच्या पत्नीनेच सुपारी देऊन पतीचा काटा काढला होता. पतीच्या हत्येकरीता पत्नीने दहा लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यातील दोन लाख रुपये मारेकर्‍यांना ऍडव्हान्स म्हणून दिला. अखेर हा कट पोलिसांनी उधळून लावलाय.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...