एका व्यक्तीचा मृत्यू, पोलिस निरीक्षकाला अटक, पोलिस दलात खळबळ
अंबाजोगाई न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
संभाजी मुंडे, परळी : एका नागरिकाचा मृत्यू झाल्यामुळे पोलिस (POLICE) निरीक्षकाला सीआयडीने (CID) अटक केली असल्याची माहिती मिळाली आहे. हा प्रकार घडल्यापासून पोलिस दलात खळबळ माजली आहे. अंबाजोगाई परिसरात या प्रकरणाची चर्चा देखील अधिक सुरु आहे. आता सीआयडी पोलिस निरीक्षकावरती खात्याअंतर्गत काय कारवाई करणार याकडे सगळ्या परळीकरांचे (PARLI) लक्ष लागले आहे. पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरे असं नाव, सीआयडीने ताब्यात घेतल्यापासून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. हे प्रकरण गंभीर असल्यामुळे अनेकांनी या प्रकरणाचा छडा लागला पाहिजे असं म्हटलं आहे.
नेमकं काय झालं
पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणी परळीतील पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरे यांना सीआयडीने अटक केली आहे. अंबाजोगाई न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं
2014 साली परळी पोलीस ठाण्याच्या कोठडीत चोरीच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात पोलिसांच्या मारहाणीत सदर आरोपीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. त्यावेळी सुध्दा या प्रकरणाची दखल घेण्यात आली होती.
अंबाजोगाई न्यायालयात हजर केले
या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरे यांच्यावर सीआयडीकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर गुरुवारी सीआयडीने कस्तुरे यांना ताब्यात घेतलं. त्यांना अंबाजोगाई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.