Traffic : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पतीने ट्रॅफिकचा फायदा घेत केली धक्कादायक गोष्ट, ज्याची सर्वत्र होतेय चर्चा

Traffic : लग्न करणारी जोडपी आपल्या सुखी संसाराची स्वप्न रंगवतात. पण काहीवेळा नवविवाहीत जोडप्यामधील एक जण अशी कृती करतो, ज्याने सर्वांना धक्का बसतो.

Traffic :  लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पतीने ट्रॅफिकचा फायदा घेत केली धक्कादायक गोष्ट, ज्याची सर्वत्र होतेय चर्चा
married couple
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 11:56 AM

बंगळुरु : लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील आनंदाचा, उत्साहाचा क्षण असतो. फक्त दोन व्यक्ती नाही, तर दोन कुटुंब या निमित्ताने जवळ येतात. लग्न करणारी जोडपी आपल्या सुखी संसाराची स्वप्न रंगवतात. पण काहीवेळा नवविवाहीत जोडप्यामधील एक जण अशी कृती करतो, ज्याने सर्वांना धक्का बसतो. हे असं सर्रास होत नाही, पण अपवादाने घडत. ज्यामुळे विवाहसंस्थेवरचा विश्वास उडतो. बंगळुरुमध्ये अशीच एक घटना घडली, ज्याची सर्वत्र चर्चा आहे. कारण नवरदेवाने फसवणुकीसाठी जी वेळ आणि ठिकाण निवडलं, त्यामुळे चर्चा होणं स्वाभाविक आहे.

ट्रॅफिकमध्ये अनेकांना कंटाळा येतो. गाड्यांचा आवाज ऐकून कान विटतात. कधी एकदा यातून बाहेर पडतोय, असं प्रत्येकाला झालेलं असतं. पण एका नवविवाहित जोडप्यामधील नवरदेवाने पळून जाण्यासाठी हीच वेळ निवडली. लग्नाच्या दुसऱ्याचदिवशी बायकोला गाडीत सोडून तो पळून गेला.

‘ती’ त्याच्यामागे पळू लागली

मागच्या महिन्यात हे जोडपं चर्चमधून परत येत होतं, त्यावेळी ही घटना घडली. महादेवपूरा येथे त्यांची कार ट्रॅफिकमध्ये अडकली होती. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय. रस्त्याच्या मध्यावर ट्रॅफिकमुळे गाड्या थांबल्या होत्या. त्यावेळी नवरदेवाने कारचा दरवाजा उघडला व पळत सुटला. त्याची बायको कारमधून उतरली व त्याला थांबवण्यासाठी त्याच्यामागे पळू लागली. पण तो पर्यंत तो नजरेआड निघून गेला.

एक्स गर्लफ्रेंडचा काय संबंध?

बंगळुरु पोलीस ठाण्यात पत्नीने तक्रार नोंदवलीय. पोलिसांकडून आता फरार नवरदेवाचा शोध सुरु आहे. लग्नानंतर त्याने पत्नीला एक्स गर्लफ्रेंड ब्लॅकमेल करत असल्याची कल्पना दिली होती. त्यावेळी पत्नीने ती आणि तिच कुटुंब आम्ही तुझ्यामागे उभे राहू असं ठामपणे सांगितलं होतं. लग्नाआधी त्याने त्याच्या प्रेम प्रकरणाची होणाऱ्या पत्नीला कल्पना दिली होती. पत्नीने तक्रारीत नवऱ्याच्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल काय म्हटलय?

प्रेम प्रकरण संपवण्याच आश्वासन दिलं होतं. “एक्स गर्लफ्रेंड त्याला प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत होती. आपली बदनामी होईल, या भीतीपोटी तो पळून गेला” असं पत्नीने तिच्या तक्रारीत म्हटलं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.