Crime News : बाईकवर असताना नको तिथे स्पर्श होताच, तिने थेट….अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल
Crime News : पुढे बसलेल्या ड्रायव्हरने काय केलं? महिलांवर होणारे अत्याचार, गुन्हे रोखण्यासाठी कठोर कायदे केलेत. पण अजूनही महिलांविरोधातील गुन्हे कमी झालेले नाहीत.
Crime Against Women : महिलांवर होणारे अत्याचार, गुन्हे रोखण्यासाठी कठोर कायदे केलेत. पण अजूनही महिलांविरोधातील गुन्हे कमी झालेले नाहीत. आरोपींना जरब बसलेली नाही. त्यामुळे देशाच्या कुठल्या ना कुठल्या भागात महिलांविरोधात गुन्हे घडत असतात. बंगळुरुमध्ये एका 30 वर्षीय महिलेसोबत असाच प्रकार घडला. त्यानंतर महिलेने कुठलीही पर्वा न करता धावत्या रॅपिडो बाईकवरुन उडी मारली.
21 एप्रिलच्या रात्री महिलेसोबत हा प्रकार घडला. पीडित महिलेने रॅपिडो राइड बुक केली होती. इंदिरानगरला तिला जायच होतं. ड्रायव्हरने तिला 11 वाजून 10 मिनिटांनी पीक केलं.
ड्रायव्हरने काय केलं?
ड्रायव्हर असलेल्या बायकरने OTP चेक करण्याच्या बहाण्याने या महिलेकडून तिचा फोन घेतला. त्यानंतर त्याने एअर पोर्टच्या दिशेने बाईक न्यायला सुरुवात केली. या दरम्यान ड्रायव्हरने महिलेला पकडण्याचा, नको तो स्पर्श केला.
हरकत घेत विरोध
महिलेने ड्रायव्हरच्या कृतीवर लगेच हरकत घेत विरोध केला. ती ड्रायव्हरला योग्य मार्गावरुन जायला सांगत होती. पण ड्रायव्हर काही ऐकत नव्हता. अखेर या महिलेने स्व:ला वाचवण्यासाठी धावत्या बाईकवरुन उडी मारली.
#WATCH| Bengaluru, Karnataka: Woman jumps off a moving motorbike after the rapido driver allegedly tried to grope her & snatched her phone
On 21st April, woman booked a bike to Indiranagar, driver allegedly took her phone on pretext of checking OTP & started driving towards… pic.twitter.com/bPvdoILMQ2
— ANI (@ANI) April 26, 2023
पोलिसांनी काय सांगितलं?
“आमच्या विभागात घडलेला हा पहिला गुन्हा आहे. आमच्या आयुक्तांनी सर्व टॅक्सी आणि बाईक टॅक्सी चालकांना बोलावल. त्यांच्यासोबत महिला आणि नागरी सुरक्षेसंदर्भात चर्चा केली” असं डीसीपींनी सांगितलं. ड्रायव्हर मूळचा कुठलाय?
आरोपी ड्रायव्हर विरोधात विनयभंगाच कलम 354 आणि कलम 366 अंतर्गत गुन्हा नोंदवलाय. कंपन्या जेव्हा एखाद्याला हायर करतात, तेव्हा त्यांनी संबंधिताची कौटुंबिक पार्श्वभूमी तपासली पाहिजे. NOC घेणं आवश्यक आहे. ड्रायव्हर हैदराबादचा आहे. तो मागच्या 5 वर्षांपासून बंगळुरुत राहतोय. हैदराबादमध्ये त्याचा काही रेकॉर्ड आहे का? आम्ही चेक करु. पोलिसांनी आरोपीला अटक केलीय. त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवलय.