BF GF News : BF म्हणाला तुझा तो व्हिडीओ पाठव नाहीतर नस कापून घेईल, भावनेच्या भरात तिनेही पाठवला पण… क्षणात सर्व काही संपलं!
प्रेमात काहीवेळा धोका होतो, मुली एकाचवेळी दोघांना डेट करत असतात. तर काहीवेळ मुलं फक्त टाईमपास म्हणून मुलीसोबत असतात. शरीर सुखासाठी काहीजण इमोशनल करून शारीरिक संबंध ठेवतात. शातच आणखी एक प्रकरण समोर आलं आहे.
Crime : प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं सारखं असतं, हे आपण अनेकवेळा ऐकलं असेल. प्रेम आंधळं असतं असंही अनकेवळा बोललं जातं. प्रेमात काहीवेळा धोका होतो, मुली एकाचवेळी दोघांना डेट करत असतात. तर काहीवेळ मुलं फक्त टाईमपास म्हणून मुलीसोबत असतात. शरीर सुखासाठी काहीजण इमोशनल करून शारीरिक संबंध ठेवतात. त्यानंतर फसवणूक झालेली अशी अनेक प्रकरण आपण पाहिली आहेत. अशातच आणखी एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यामध्ये तरूणाने आपल्या गर्लफ्रेंडला इमोशनल करत तिचा न्युड व्हिडीओ घेतला. त्यानंतर जे झालं त्याने तरूणीचं त्याने सर्वांनाच धक्का बसला.
नेमकं काय घडलं?
आधी तरुणाने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवले, मुलीच्या भावनांशी खेळ केला आणि ती त्याच्या जाळ्यात अडकल्यावर तरुणाने आपलं खरं रूप दाखवलं. एका वस्तीतील एका मुलीचे त्याच परिसरातील अर्शदसोबत प्रेमसंबंध होते. तरूणी त्याच्या प्रेमात वेडी झालेली होती. याच गोष्टीचा फायदा अर्शदने घेतला आणि एक दिवस तिला न्यूड व्हिडीओ तयार करून पाठवायला सांगितला.
पीडितेने आधी यासाठी त्याला नकार दिला, मात्र अर्शदने तिला आपल्या हात नसेल कापून टाकेल अशी धमकी देत परत एकदा व्हिडीओ पाठवण्याची मागणी केली. इमोशनल ब्लॅकमेल केल्यानंतर अखेर मुलीने प्रेमाखातर आपला व्हिडीओ शुट करत त्याला पाठवला.
हा व्हिडीओ अर्शदने स्वत: पाहिला आणि तो व्हायरल केला. तरूणीला त्यानंतर एक फोन आला आणि तो व्हिडीओ माझ्याकडे आला असल्याचं सांगतच तिला ब्लॅकमेल करू लागला. संबंधित ब्लॅकमेल करणारा तरूण हा आरोपी अर्शद याचा मित्र तन्वीर होता. तरूणीच्या सर्व लक्षात आल्यावर तिने काझी मोहम्मदपूर पोलीस ठाण्यात प्रियकर अर्शद तनवीरसह पाच जणांची नावे नोंदवून गुन्हा दाखल केला. बिहारमधील मुजफ्फरपूरमधील ही घटना असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.