Murder Mystery : उत्तर प्रदेशातील ‘भाभी हत्याकांड’ प्रकरणी पोलिसांचा धक्कादायक खुलासा!
वहिनीच्या एकतर्फी प्रेमात दीर आकंठ बुडाला! प्रपोजही केलं, नकार देताच झाला कासावीस
उत्तर प्रदेशमध्ये एका दीराने एकतर्फी प्रेमातून (One Sided Love) आपल्याच वहिनीची हत्या (UP crime News) केली. उत्तर प्रदेशच्या उन्नाव (Unnav) जिल्ह्यात हे हत्याकांड घडलं. या हत्याकांडा खुलासा करताना पोलिसांनी धक्कादायक माहिती दिली. यात खळबळजनक हत्येच्या घटनेनं वहिनी आणि दिराच्या नात्याला काळीमा फासला गेलाय. भर रस्त्यात वहिनीचा मृतदेह सोडून आरोपी दीर फरार झाला होता.
या हत्याकांड प्रकरणाचा छडा लावण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं होतं. दिवाळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या वहिनी दीरासोबत घराबाहेर पडली होती. पण त्याचवेळी दिराने वहिनीचा खून केला. त्यानंतर वहिनीचा मृतदेह तिथेच निपचीत ठेवत दिराने घटनास्थळावरुन पळ काढला होता.
उन्नावच्या ढकोली गावात ही घटना घडली. वहिनीच्या हत्येनंतर दीर फरार असल्यामुळे सुरुवातीला वेगळीच शंका उपस्थित केली गेली. वहिनीच्या हत्येनंतर दिराचं अपहरण करण्यात आलं असावं, असा संशय पोलिसांना आला होता. पण अखेर तपासादरम्यान, वेगळंच प्रकरण समोर आलं.
कॉल डिलेट्स, दिराचे त्याच्या साथीदारांशी असलेला संपर्क, लोकेशनचं ट्रेसिंग या सगळ्यामुळे पोलिसांचा संशय सत्यात बदलत गेला. वहिनीच्या हत्येला दीरच जबाबदार असल्याचं लक्षात आलं. अखेर फरार दीराला पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी केली.
जावेदची बायको त्याच्या भाऊ नौखेजसोबत दिवाळीची खरेदी करायला घरातून निघाली होती. त्यानंतर त्याने आपल्या साथीदारांना सज्ज राहण्यास सांगितलं होतं. वाटेत आपल्या मित्रांना बोलवल्यानंतर नौखेजने वहिनीच्या नाकावर वार केला. पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार तिचा गळाही दाबण्यात आला होता.
त्यानंतर आपली बाईक मित्रांच्या घरी नौखेजने पार्क केली आणि तो फरार झाला. पण वहिनीचा मृतदेह सापडल्यानंतर अख्ख्या कुटुंबासह गावही हादरलं. चौकशीअंती नौखेजने हत्या करण्याचं कारणही स्पष्ट केलं.
नौखेजच्या मोठ्या भावाचं लग्न 21 मे रोजी झालं. मोठा भाऊ लग्नानंतर बाहेर गेला. त्यादरम्यान, नौखेजची वहिनीसोबत जवळीक वाढली. तो तिच्या प्रेमात पडला. एकतर्फी प्रेम करु लागला.
नौखेजने वहिनीला प्रपोजही केलं. पण तिने नकार दिल्यामुळे नौखेज कासावीस झाला आणि त्याच्या रागातूनच त्याने तिची हत्या केली, असं पोलिसांच्या तपासातून समोर आलं.