बघता-बघता आगीने कंटेनरला विळखा घातला, मोठा अनर्थ टळला असल्याची परिसरात चर्चा

आतापर्यंत रस्त्यात अनेक गाड्या जळाल्याचे आपण पाहिले आहे. त्याची कारणं सुध्दा वेगवेगळी आहेत. अशा लागलेल्या आगीत आतापर्यंत अनेकदा चालकांचा मृत्यू झाला आहे.

बघता-बघता आगीने कंटेनरला विळखा घातला, मोठा अनर्थ टळला असल्याची परिसरात चर्चा
Bhandara truck burningImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Apr 01, 2023 | 12:45 PM

भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या पवनीत मुख्य मार्गालगत (pavani highway) हायड्रॉलिक उचलण्याच्या प्रयत्नात असताना एका खाली कंटेनर ट्रकला (container truck) विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने ट्रकने अचानक पेट घेतला. त्यावेळी तिथं असलेल्या जागृत नागरिकांनी तिथं असणाऱ्या लोकांना सावध केले. त्याचबरोबर तिथं कोणीही जवळ न जाण्याची विनंती केली. काही क्षणात संपूर्ण ट्रकला आगीने वेढलं होतं. त्यावेळी चालकाने ट्रकमधून बाहेर उडी घेतली. त्यामुळे तो बचावला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले.

भंडारा जिल्ह्याच्या पवनीत मुख्य मार्गालगत बर्निंग डंपरचा थरार पाहायला मिळाला. भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 287 वर खापरी नाका येथे (एम एच 36 ए.ए 57 66 क्रमांकाचा) टिप्पर उभा होता. दरम्यान, सदर ट्रक चालक त्या ट्रकचे हायड्रोलिकवर उचलत असताना अनावधानाने त्या डंपरच्या ट्रॉलीला जिवंत विद्युतारांचा स्पर्श झाला, तारांना स्पर्श होताच क्षणार्धात त्या टिप्परला आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररूप धारण केले. वेळीच चालक गाडी बाहेर पडल्याने त्याचे प्राण वाचले आहे. दरम्यान या घटनेची माहिती पवनी पोलिसांना होताच पवनी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तसेच पवनी नगर परिषद येथील अग्निशमन वाहन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले आणि मोठा अनर्थ टळला आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक मालकाचे मोठे नुकसान झाले आहे.

हे सुद्धा वाचा

आतापर्यंत रस्त्यात अनेक गाड्या जळाल्याचे आपण पाहिले आहे. त्याची कारणं सुध्दा वेगवेगळी आहेत. अशा लागलेल्या आगीत आतापर्यंत अनेकदा चालकांचा मृत्यू झाला आहे.

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.