Bhandara News : बारावीत पास झाल्यानंतर सेलिब्रेशन करायला गेला आणि वैनगंगा नदीत बुडाला! दुर्दैवी मृत्यू

Bhandara 12th Student Drowned : तुमसर तालुक्यातील माडगी रेलवे पुलाखाली वैनगंगा नदीत पात्रात 16 वर्षांचा विद्यार्थी बुडाला.

Bhandara News : बारावीत पास झाल्यानंतर सेलिब्रेशन करायला गेला आणि वैनगंगा नदीत बुडाला! दुर्दैवी मृत्यू
बुडून मृत्यूImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 8:26 AM

भंडारा : बुधवारी बारावीचा निकाल (HSC Result 2022) लागला. या निकालानंतर बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेला एक विद्यार्थी आनंद साजरा करायला नदीवर गेला. नदीत पोहण्यासाठी उतरलेला हा विद्यार्थी बुडू (HSC Student Drowned) लागला. त्याचे दोन मित्र त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांनी आरडाओरडा केला. पण हे प्रयत्न फोल ठरले आणि नदीत बुडून या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना घडली भंडाऱ्या जिल्ह्यातील तुमसर तालुक्यामध्ये. संपूर्ण तुमसर (Bhandara Crime News) तालुक्यात या घटनेनं हळहळ व्यक्त केली जातेय. बारावीच्या परीक्षेत पास झालेल्या या विद्यार्थ्याला सेलिब्रेशन करणं अंगलट आहे. या घटनेनंतर या विद्यार्थ्यांच्या दोन मित्रांनाही मोठा धक्का बसलाय.

नेमकी घटना काय घडली?

तुमसर तालुक्यातील माडगी रेलवे पुलाखाली वैनगंगा नदीत पात्रात 16 वर्षांचा विद्यार्थी बुडाला. निखिल महादेव बालगोटे असं या युवकाचं नाव असून तो गुरूनानक नगर तुमसर इथं राहणारा होता. बुधवारी बारावीचा निकाल लागला. निखिलला 57 टक्के गुण मिळाले होते. याचा आनंद व्यक्त करण्यासाठी निखिल निकाल लागल्यानंतर आपल्या दोन मित्रांसह माडगी येथील वैनगंगा नदी पात्राजवळ सेलिब्रेशन करायला गेला होता.

दरम्यान त्यांना पाण्यात पोहण्याचा मोह झाल्याने त्यांनी पोहण्याचा मनोसोक्त आनंद घेतला. दरम्यान निखिल हातपाय धुण्याकरता पाण्यात गेला असता त्याच्या तोल गेला आणि तो नदी पात्रात बुडाला. त्याचे दोन मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा करत होते. पण तोपर्यंत निखिल नदीपात्रात वाहून गेला होता.

हे सुद्धा वाचा

अधिक तपास सुरु

या घटनेची माहिती तुमसर पोलिसाला मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठलं. मृतक निखील याचा शोध नदीपात्रात सुरु केला असता सुमारे एक ते दीड तासानंतर त्याचा मृतदेह आढळला. त्याच्या मृतदेह शव विच्छेदनाकरिता तुमसर उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आला. सध्या याप्रकरणी पुढील तपास तुमसर पोलिस करत आहेत. 12वी च्या परीक्षेत पास झालेला निखिलच्या दुर्दैवी मृत्यूने सर्वत्र दुःख व्यक्त केलं जातंय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.