मित्राच्या बायकोसोबत विवाहबाह्य संबंध, अडथळा ठरणाऱ्या मित्रालाच संपवलं

विवाहबाह्य प्रेम प्रकरणातून मित्रानेच जीव घेतल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील हिवरा भागात घडली आहे. (Bhandara Man kills friend )

मित्राच्या बायकोसोबत विवाहबाह्य संबंध, अडथळा ठरणाऱ्या मित्रालाच संपवलं
Follow us
| Updated on: Jan 29, 2021 | 11:46 AM

भंडारा : विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या मित्राची हत्या केल्याचा प्रकारा भंडारा जिल्ह्यात उघडकीस आला आहे. आरोपीचे मयत तरुणाच्या पत्नीशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे मार्गातील काटा काढण्यासाठी मित्रानेच मित्राची रुमालाने गळा आवळून हत्या केली. (Bhandara Man kills friend over extra marital affair with deceased’s wife)

मित्राच्या पत्नीशी प्रेमसंबंध

विवाहबाह्य प्रेम प्रकरणातून मित्रानेच जीव घेतल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील हिवरा भागात घडली आहे. आरोपी राकेश मतारे याचे 26 वर्षीय मित्र अमोल चवलेच्या पत्नीशी प्रेमसंबंध होते. मात्र अफेअरमध्ये अडसर ठरणाऱ्या अमोलची राकेशने निर्घृण हत्या केली.

रुमालाने गळा आवळून विहिरीत फेकलं

रुमालाने गळा आवळून राकेशने अमोलची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह एका विहिरीत फेकून दिला होता. अमोल मृतावस्थेत आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली. हत्येप्रकरणी आरोपी मित्र राकेश मतारे याला आंधळगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध कलम 302, 201 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

एकाच आठवड्यात विवाहबाह्य संबंधातून दोन मृत्यू

एकाच आठवड्यात विवाहबाह्य संबंधातून मृत्यू होण्याच्या दोन घटना भंडाऱ्यात समोर आल्या आहेत. विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी गेला असताना अचानक पती आल्यामुळे गडबड उडून घरातून पळताना पडून प्रियकाराचा मृत्यू झाल्याचा प्रकार बुधवारीच घडला होता.

महेश वसंत डोंगरवार हा तरुण विवाहित प्रेयसीला भेटायला गेला होता. भंडारा शहरालगतच्या गणेशपूर येथील मेहर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची भेट घेण्यासाठी महेश मध्यरात्री गेला होता. महेश आणि संबंधित विवाहिता बेडरुममध्ये असताना अचानक दार वाजलं आणि दोघांची भंबेरी उडाली. (Bhandara Man kills friend over extra marital affair with deceased’s wife)

बाल्कनीतून पळण्याची घाई अंगलट

विवाहित प्रेयसीच्या पतीची अचानक एंट्री झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला. महेश तातडीने बेडरुममधून बाल्कनीत पळाला. दरवाजा लावत खाली उतरण्याची त्याने घाई केली. या गडबडीत महेशचा पाय घसरला आणि तो थेट सिमेंटच्या रस्त्यावर पडला.

प्रेयसीच्या तक्रारीनंतर पोलिसात नोंद

अपार्टमेंटच्या बाल्कनीतून खाली थेट रस्त्यावर पडल्यामुळे महेशला जबर मार बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. विवाहित प्रेयसीने दिलेल्या तक्रारीवरुन भंडारा शहर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र चर्चेला तोंड फुटलं आहे.

संबंधित बातम्या :

विवाहित प्रेयसीसोबत बेडरुममध्ये असताना नवरा दारात, बाल्कनीतून पळताना पडल्याने भंडाऱ्यात प्रियकराचा मृत्यू

खुर्चीत बसून शारीरिक संबंधात तरुणाला गळफास, अटकेतील तरुणी प्रेयसी नव्हे, पत्नी?

(Bhandara Man kills friend over extra marital affair with deceased’s wife)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.