आपसातील वाद टोकाला गेला, मग लस्सी विक्रेत्याला भररस्त्यात भोसकला !

लस्सी विक्रेता तरुण नेहमीप्रमाणे आपल्या दुकानात होता. इतक्यात तीन तरुण तिथे आले अन् राडाच झाला. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

आपसातील वाद टोकाला गेला, मग लस्सी विक्रेत्याला भररस्त्यात भोसकला !
आपसातील वादातून तरुणाला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 29, 2023 | 8:14 AM

भंडारा : आपसातील वादातून लस्सी विक्रेता युवकावर धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना भंडाऱ्यात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. भंडारा शहरातील गांधी चौकात काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अमन नांदुरकर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. हत्येनंतर नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. घटनास्थळाचा पंचनामा करत पुढील तपास सुरु केला आहे.

घटनेनंतर नागरिकांकडून आरोपींना चोप

अमन नांदुरकर हा तरुण लस्सी विक्रीचा व्यवसाय करतो. काल रात्रीच्या सुमारास तीन जण तेथे आले. यानंतर आपसातील वादातून त्यांनी अमनवर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अमनचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात उपस्थित नागरिकांनी हल्लेखोरांचा पाठलाग करून त्यांना चांगलाच चोप दिला. नागरिकांच्या मारहाणीत तीन आरोपी जण जखमी असून, त्यातील आरोपी अभिषेक साठवणे हा गंभीर जखमी झाला आहे. जखमी अभिषेकला पुढील उपचारासाठी नागपूरला हलवले आहे.

वादाचे नक्की कारण अनभिज्ञ

घटनेनंतर मृतकाच्या मित्रमंडळींनी जिल्हा सामान्य रग्णालयात धाव घेत तिथे उपचारासाठी दाखल आरोपींना पकडून मारहाण केली. यामुळं शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांसह राज्य राखीव दलाचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, पीडित आणि आरोपी यांच्यात नेमका काय वाद होता? याबाबत अद्याप कळू शकले नाही. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.