AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर नेत्यांबाबत फेसबुकवर पोस्ट; पोलीस उपनिरीक्षकाची नोकरी केली

मागील काही दिवसांपासून सूर्यवंशी अत्यंत गंभीर पोस्ट करीत होता. तो अनेक राजकीय नेते तसेच त्यांचे कुटुंबीय यांच्यासह धार्मिक आयोजनांवर वैमनस्य निर्माण करणाऱ्या पोस्ट फेसबुकवर अपलोड करत होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर नेत्यांबाबत फेसबुकवर पोस्ट; पोलीस उपनिरीक्षकाची नोकरी केली
| Edited By: | Updated on: Sep 13, 2022 | 9:55 PM
Share

भंडारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी( Prime Minister Narendra Modi ) आणि इतर नेत्यांबाबत फेसबुकवर(Facebook) आपत्तीजनक मजकूर पोस्ट करून समाजात वैमनस्य निर्माण करणाऱ्या भंडारा(Bhandara) येथील पोलीस उपनिरीक्षकालाच निलंबित करण्यात आले आहे. भंडारा पोलीस अधीक्षकांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे भंडारा आणि नागपुरातील पोलीस अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

भंडारा येथे तैनात असलेले उपनिरीक्षक सूर्यवंशी काही दिवसांपासून नेता आणि व्यवस्थेविरुद्ध वादग्रस्त मजकूर पोस्ट करीत होता. फेसबुकवर त्याची फ्रेंड लिस्ट लिमीटेड होती. त्याच्याशी निगडित व्यक्तींची संख्या कमी असल्यामुळे त्याच्या पोस्टकडे कोणाचे लक्ष गेले नाही.

मात्र, मागील काही दिवसांपासून सूर्यवंशी अत्यंत गंभीर पोस्ट करीत होता. तो अनेक राजकीय नेते तसेच त्यांचे कुटुंबीय यांच्यासह धार्मिक आयोजनांवर वैमनस्य निर्माण करणाऱ्या पोस्ट फेसबुकवर अपलोड करत होता.

शनिवारी सामाजिक कार्यकर्ता सुशील चौरसिया यांनी नागपुर जिल्ह्याच्या कोतवाली ठाण्यात त्याच्या या वादग्रस्त पोस्ट बाबत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी सूर्यवंशी विरुद्ध 294 295 (अ), 500, 504, आयटी एक्ट 67 नुसार गुन्हा दाखल केला. ही बाब लक्षात येताच भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी सूर्यवंशींच्या निलंबनाचा आदेश काढला आहे.

विशेष म्हणजे सूर्यवंशी शिपाई म्हणून नागपूर पोलीस दलात सामील झाला होता. त्याने तहसील तसेच पाचपावली ठाण्यात काम केले आहे. बंगाली पंजामध्ये गुन्हेगारांच्या दोन गटांत झालेल्या गोळीबाराच्या तपासात निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल त्याला तहसील ठाण्यातून नियंत्रण कक्षात हलविण्यात आले होते.

फेब्रुवारी महिन्यात त्याची भंडारा येथे बदली झाली आहे. यापूर्वी त्याने फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला होता. परंतु कोणी त्याला गांभीर्याने घेतले नव्हते.

मात्र, आता गुन्हा नोंद झाल्यानंतर भंडारा पोलीस अधिक्षकांनी त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. या प्रकरणामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.