AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन वर्षात 15 घरफोड्या, भंडाऱ्यात सहा दरोडेखोरांना अटक, सोने-चांदीसह साडे 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

गेल्या दोन वर्षात 15 घरफोड्या करुन लाखो रुपयांची चोरी करणाऱ्या सहा अट्टल चोरट्यांना अटक करण्यात आली आहे.

दोन वर्षात 15 घरफोड्या, भंडाऱ्यात सहा दरोडेखोरांना अटक, सोने-चांदीसह साडे 3 लाखांचा मुद्देमाल जप्त
घरफोड्या करुन लाखो रुपयांची चोरी
| Updated on: Feb 04, 2021 | 9:45 AM
Share

भंडारा : गेल्या दोन वर्षात 15 घरफोड्या करुन लाखो रुपयांची चोरी करणाऱ्या सहा अट्टल (Bhandara Six Thieves Arrest) चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एका विधीसंघर्षरत मुलाचाही समावेश आहे. त्यांच्याकडून सोने-चांदीसह 3 लाख 50 हजार रुपयांवर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे (Bhandara Six Thieves Arrest).

गेल्या दोन वर्षात जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात सतत घरफोड्या होत होत्या. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी रात्रीची गस्त आणि उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, तरीही यावर नियंत्रण मिळाले नाही. मात्र, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव आणि अपर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या घडफोड्यांतील चोरट्यांना पकडण्याचे आदेश दिले. त्यानुसार, पोलिसांनी अधिक कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली.

यादरम्यान, पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे, संशयित विधीसंघर्षरत मुलाला विश्वासात घेऊन विचारणा केली. तेव्हा त्याने घरफोडीतील इतर आरोपींची नावे दिली.

त्यावरुन पोलिसांनी जिल्ह्यातील 8 पोलीस स्टेशनच्या हद्दीत तब्बल 15 घरफोड्या करणाऱ्या 6 जणांना स्थानिय गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पहाटे त्यांच्या घरुन अटक केली. त्यांच्याकडून सोने-चांदीसह तब्बल 3 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. घरफोडी करणारे सहाही आरोपी हे भंडारा शहरातील रहिवासी असून त्यांच्यातील दोन आरोपी हे अल्पवयीन असल्याने त्यांची बाल सुधार गृहात त्यांची रवानगी करण्यात आली आहे.

असे करायचे घरफोडी

बाहेरगावी गेलेल्या लोकांच्या घराची टेहळणी करुन नंतर कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रकार हे लोक करत असत. केवळ मज्जा करण्यासाठी चोरी करणाऱ्या या युवकांनी चोरी केलेले सोने नंतर विकण्यासाठी वितळवून ठेवले होते. त्यामुळे मूळ मालकाला ते कसे परत करावे, असा प्रश्न पडल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले (Bhandara Six Thieves Arrest).

कोल्हापुरात जेवणातून गुंगी देऊन दागिन्यांची लूट

लातूरमधील नऊ जणांना देवीच्या जागराच्या बहाण्याने कोल्हापूरला बोलावण्यात आलं. लातूरमधील नऊ जण कोल्हापूरला गेले होते. बिंदू चौक परिसरातील एका लॉजमध्ये हे सर्व जण थांबले होते. नऊ जणांना आरोपीने जेवणातून गुंगीचे औषध दिले. सर्व जण बेशुद्धावस्थेत असताना रात्रीच्या वेळी भामटा नऊ जणांचे दागिने आणि पैसे घेऊन पसार झाला.

पीडित कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात

तक्रारदारांना बेशुद्ध आणि अत्यवस्थ अवस्थेत कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले. लुटीच्या घटनेमुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून संशयिताचा शोध सुरु आहे.

Bhandara Six Thieves Arrest

संबंधित बातम्या :

दारुची बाटली आणायला नकार, मित्रांकडून मित्राचा भोसकून खून, दोघांना बेड्या

गुजरातमधील व्यापाऱ्याचे अपहरण करुन फरार, नागपूर पोलिसांच्या जाळ्यात सापडला

‘क्राईम पेट्रोल’, ‘दृश्यम’चा इफेक्ट, खेळताना पुन्हा पुन्हा ‘राज्य’ आल्यानं मित्राला गाडलं; 13 वर्षीय मुलाला अटक

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.