Bhandara : मावशीने दिले गुंगीचे औषध, बनवला आक्षेपार्ह व्हिडिओ, घडला हा विपरीत प्रकार

भंडाऱ्यात एक मावशीने धक्कायक प्रकार केला आहे. या मावशीने नात्यातील सर्व सीमा पार केल्या असून चहात गुंगीचे औषध (Numb medicine) टाकून मुलीला बेशुद्ध (Girl) केले.

Bhandara : मावशीने दिले गुंगीचे औषध, बनवला आक्षेपार्ह व्हिडिओ, घडला हा विपरीत प्रकार
मुलीला गुंगीचे औषध देऊन अत्याचारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 5:48 PM

अनिल आक्रे, प्रतिनिधी, भंडारा : “माय मरो पण मावशी जगो” अशी मावशीची महती सांगणारी म्हण आपण नेहमी ऐकत आलोय, पण भंडाऱ्यात एक मावशीने धक्कायक प्रकार केला आहे. या मावशीने नात्यातील सर्व सीमा पार केल्या असून चहात गुंगीचे औषध (Numb medicine) टाकून मुलीला बेशुद्ध (Girl) केले. त्यानंतर एका मुलाच्या साह्याने आक्षेपार्ह व्हिडीओ (Video) बनवून तिला ब्लॅकमेल केलं. ही भयानक घटना भंडारा जिल्ह्यात साकोली येथे घडली आहे. विशेष म्हणजे वीडियो बनवणाऱ्या आरोपीने एक वर्ष संबधित पीडित मुलीचे शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित मुलीने तक्रार दिल्यानंतर शोषण करणाऱ्या मुलाला व मावशीला साकोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गोवर्धन गोविंदा बावनकुळे असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर खळबळ माजली आहे.

नेमका प्रकार काय घडला?

संबधित पीड़ित मुलगी ही गोंदिया जिल्ह्यातील असून एक वर्षाआधी मार्च 2021 मध्ये पीडित मुलगी व तिची आई साकोली तालुक्यातील एका गावात चुलत मावस बहिणीकडे विवाह समारंभाकरिता आली होती. समारंभ आटोपल्यानंतर दोघेही मुक्कामी थांबले, त्यावेळी चुलत मावशीने पीडितेला चहा दिला व तिला साड्या पाहाण्याकरिता बोलाविले. काही क्षणातच पीडित मुलीला चक्कर आली. काही वेळानंतर मुलगी उठली तेव्हा तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. त्यावेळी तिने आपल्या मावशीला विचारले असता, मावशीने तिला आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ दाखविले तसेच कोणाला सांगू नकोस, अशी दमदाटी केली. त्यानंतर वर्षभर हा सर्व प्रकार सुरू राहिला.

पोलिसांकडून आरोपींना अटक

दरम्यान ज्या मुलाने मोबाईलमध्ये फोटो व व्हिडीओ तयार केला, हे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तो पीडित मुलीला वारंवार फोन करून तिच्या गावी जाऊन तिचे शोषण करत होता. मागील महिन्यात पीडित मुलीच्या गावी पुन्हा एक लग्न समारंभ असल्याने सर्व नातेवाईक तेथे आले. त्यावेळी मावशीने मुलीला बाहेर चौकात नेले. त्यावेळी हा सर्व प्रकार उघडकीला आला. पीडितेच्या आई-वडिलांना या सर्व प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ साकोली पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी पीडित मुलगी व तिच्या पालकांच्या तक्रारीवरून मुलगा व तिच्या मावशीविरोधात भादंविच्या कलम 376, 354, 328, 506 कलमांनुसार गुन्ह्याची नोंद करून आरोपींना अटक केली आहे. साकोली पोलीस पुढील तपास करीत आहे.

इंदापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दरोड्यातील आरोपींना पाच तासात गजाआड; दोघांना ताब्यात

Ambernath | आईला मारहाण करणाऱ्या दारुड्या बापाच्या हत्येचा प्रयत्न, अंबरनाथमध्ये सावत्र मुलांवर गुन्हा

Pune crime : प्रेमवीरानं घेतला प्रेयसीच्या गालाचा चावा, आता खातोय जेलची हवा!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.