अभिनेत्याकडून तब्बल 50 लाखाच्या नकली नोटा जप्त, पोलिसांकडून बेड्या, फिल्मी दुनियेत खळबळ

भोजपुरी अभिनेता मोहम्मद शाहीदच्या घरात 50 लाखांच्या नकली नोटा आढळल्या आहेत (Bhojpuri actor arrested with fake currency of rs 50 lakh).

अभिनेत्याकडून तब्बल 50 लाखाच्या नकली नोटा जप्त, पोलिसांकडून बेड्या, फिल्मी दुनियेत खळबळ
Follow us
| Updated on: Mar 18, 2021 | 7:51 PM

नवी दिल्ली : भोजपुरी अभिनेता मोहम्मद शाहीदच्या घरात 50 लाखांच्या नकली नोटा आढळल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी हरी नगर परिसरात छापा टाकल्यानंतर या अभिनेत्याच्या दुष्कृत्यांचा भांडाफोड झाला. विशेष म्हणजे या कामात त्याच्यासोबत एक चित्रपट निर्मातादेखील सामील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भोजपुरी चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे (Bhojpuri actor arrested with fake currency of rs 50 lakh).

पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक खुलासे

पोलिसांनी केलेल्या कारवाईत महत्त्वपूर्ण गोष्टींचा खुलासा झाला. अभिनेता मोहम्मद शाहीद निर्मात्यासोबत मिळून नकली नोटा छापयचा. त्यानंतर बाजारात, गर्दीच्या ठिकाणी काही लोकांना नकली नोटा देऊन त्या नोटा चालवायला सांगायचा. पोलिसांना अभिनेता आणि निर्मात्याच्या बॅगेत बनावट नोटांचे चक्क 200 बंडल मिळाले. विशेष म्हणजे पोलिसांनी त्यांची चौकशी केली तेव्हा त्यांच्याजवळ असलेली बाईक देखील चोरीची आहे, अशी माहिती समोर आली (Bhojpuri actor arrested with fake currency of rs 50 lakh).

कोणत्या भोजपुरी सिनेमात काम केलंय?

पोलिसांनी चौकशी केल्यानंतर अभिनेता मोहम्मद शाहीदने ‘इलाहाबाद टू इस्लामाबाद’ या भोजपूरी सिनेमात काम केल्याची माहिती समोर आली. या अभिनेत्याचं साहिल सनी फिल्म प्रोडक्शन आहे. त्याचबरोबर तो अनेक म्युजिक व्हिडीओंमध्ये चमकला आहे, अशीदेखील माहिती पोलीस तपासात समोर आली.

पोलिसांकडून अभिनेत्याला अटक

या अभिनेत्याने सुरुवातीला नेहरु प्लेस, लाजपत नगर आणि न्यू फ्रेंडली कॉलनीच्या लोकांना टारगेट करण्यास सुरुवात केली. तिथे ते काही लोकांना बाजारात चालवण्यासाठी बनावट नोटा द्यायचे. अभिनेता गाडी देखील चोरी करायचा. सुरुवातीला गाडी चोरी करणाऱ्या व्यक्तीसोबत त्याने संपर्क केला. त्यानंतर त्याने त्याच्यासोबत मिळून गाडी चोरी करायला सुरुवात केली. पोलिसांना त्याच्या या कृत्याचा सुगावा लागला. त्यानंतर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

हेही वाचा : सचिन वाझेंबाबतचा फडणवीसांचा ‘तो’ दावा कपोलकल्पित!, सिद्ध करुन दाखवा, अनिल परबांचं आव्हान 

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.