Murder Mystery : ‘दृश्यम’लाही लाजवेल असं हत्याकांड! प्रेयसीचे मित्राशी संबंध असल्याचा संशय, खून करुन मित्राला घरातच पुरलं

Madhya Pradesh Crime News : सोमवारी रात्री खरंतर या हत्याकांडाचा उलगडा होण्यास सुरुवात झाली होती. दारु पिऊन नशेत आरोपी शमसेर हा आपल्या प्रेयसीसोबत वाद घालू लागला.

Murder Mystery : 'दृश्यम'लाही लाजवेल असं हत्याकांड! प्रेयसीचे मित्राशी संबंध असल्याचा संशय, खून करुन मित्राला घरातच पुरलं
खळबळजनक हत्याकांडImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 1:42 PM

मध्य प्रदेशातून खळबळजनक घटना समोर आली आहे. दृश्यम सिनेमाची (Drishyam Movie) आठवण या हत्याकांडानं सगळ्यांना झाली आहे. एका तरुणानं आपल्याच मित्राची हत्या (Murder Mystery) केली. यानंतर मित्राचा मृतदेह (Friend dead body) स्वतःच्याच घरात पुरला. हे हत्याकांड घडण्यामागचं कारणं ठरलं, संशय! प्रेयसीचे आपल्याच मित्रासोबत संबंध असल्याचा संशय या तरुणाला होता. याच संशयातून तरुणाने आपल्या मित्राचा जीव घेतलाय. या हत्याकांडाचा अखेर छडा लागलाय. हे हत्याकांड उघडकीस आल्यानंतर सगळेच हादरुन गेलेत. कुणी कल्पनाही केली नसेल, असा प्रकार या तरुणानं हत्येनंतर केलाय. हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव शिवदत्त भालेराव असं होतं. बबलू उर्फ बदमाश शमशेर यानं शिवदत्तचा खून केला होता. अंगावर काटा आणणारं हे गूढ हत्याकांड अखेर पोलिसांनी आपल्या तपासातून उकललंय.

सात महिन्यांपासून बेपत्ता

नोव्हेंबर 2021 पासून शिवदत्त भालेराव उर्फ शिवा हा सात महिन्यांपासून बेपत्ता होता. त्याचा शोध सगळीकडे घेतला गेला. पण शिवा कुठेच सापडला नाही. अखेर पोलिसांना याबाबत तक्रार देण्यात आली. तब्बल सात महिन्यानंतर शिवाची हत्या झाली असल्याचं उघड झाल्यानं सगळेच हादरुन गेलेत.

खळबळजनक

दीपक द्वीवेदी यांच्या रिपोर्टनुसार, मंगळवारी शिवा याचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढलून आला. धक्कादायक बाब म्हणजे शिवाचा मृतदेह त्याच्या मित्राच्या घरातून पोलिसांनी पुरलेल्या अवस्थेत आढळून आला होता. शिवाच्या मृतदेहाचे अवशेष आढळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

हे सुद्धा वाचा

पाहा मुंबईतली महत्त्वाची अपडेट : दादरमध्ये पावसाच्या सरी

सोमवारी रात्री खरंतर या हत्याकांडाचा उलगडा होण्यास सुरुवात झाली होती. दारु पिऊन नशेत आरोपी शमसेर हा आपल्या प्रेयसीसोबत वाद घालू लागला. या वादावेळी शमशेरनं नशेच प्रेयसीला उद्देशून तिला धमकावलं. जसं शिवाला मारुन पुरलं होतं, तसंच तुलाही मारुन पुरुन टाकेन, अशी धमकी आरोपी शमशेनं प्रेयसीला दिली. शेजारच्यांनी हा सगळा प्रकार ऐकला आणि याची माहिती पोलिसांनी दिली.

सडलेल्या अवस्थेत मृतदेहाचा सांगाडा

यानंतर पोलिसांनी तत्काळ या सगळ्याप्रकाराची गंभीर दखल घेत पावलं उचलली. शिवाचा मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांनी मोहीम राबवली. आरोपी शमशेरच्या घरी पोलिसांनी धडक दिली आणि त्याचं घरचं उकरून काढलं. या तपासात पोलिसांनी खोदलेल्या खड्ड्यामध्ये सडलेल्या अवस्थेत एका मृतदेहाचे अवशेष सापडले. यानंतर पोलिसांनी लगेचच आरोपी शमशेरला बेड्या ठोकल्यात.

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आरोपी शमशेरची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये खळबळजनक खुलासा करण्यात आला. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी शमशेरनं गुन्ह्याची कबुली दिली. आपल्या प्रेयसीसोबत आपलाच मित्र संबंध ठेवत असल्याचा संशय असल्याच्या कारणावरुण मित्राचा काटा काढला असल्याचं शमशेरनं पोलीस तपासात कबूल केलंय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.