मुंबई NCB ची मोठी कारवाई; सहा दिवसांत पाच कोटींचे ड्रग्ज हस्तगत
मुंबई NCB ने मोठी कारवाई करत तीन दिवसांत पाच कोटींचे ड्रग्ज हस्तगत केले आहे. मुंबई NCB ने गेल्या सहा दिवसांत तीन कारवाया केल्या आहेत. यात 4.950 किलो मेथाक्वॉलोन, 870 ग्रॅम हायड्रोपोनिक विड, 88 किलो चांगल्या प्रतीचा गांजा या प्रकारचे ड्रग्ज हस्तगत केले आहे. जप्त केलेल्या अंमली पदार्थांची किंमत जवळपास 5 कोटींच्या आसपास आहे.
मुंबई : मुंबईतील अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (Narcotics Control Bureau) अर्थात एनसीबीने ठिकठिकाणी धाड टाकत ड्रग्ज पॅडलर्सचे जाळे खिळखिळे करुन टाकले आहे. एनसीबीच्या कारवाया सुरुचत असताना देखील मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी होत आहे. मुंबई NCB ने मोठी कारवाई करत तीन दिवसांत पाच कोटींचे ड्रग्ज हस्तगत केले आहे. मुंबई NCB ने गेल्या सहा दिवसांत तीन कारवाया केल्या आहेत. यात 4.950 किलो मेथाक्वॉलोन, 870 ग्रॅम हायड्रोपोनिक विड, 88 किलो चांगल्या प्रतीचा गांजा या प्रकारचे ड्रग्ज हस्तगत केले आहे. जप्त केलेल्या अंमली पदार्थांची किंमत जवळपास 5 कोटींच्या आसपास आहे. या कारवाई दरम्यान एनसीबीने दोन वाहने जप्त केली असून तीन संशयितांना देखील ताब्यात घेतले आहे.
NCB Mumbai conducted three operations in the last six days and seized 4.950 kg of methaqualone, 870 gm hydroponic weed, 88 kg of good quality ganja, two vehicles and apprehended three suspects. The value of the seized narcotics is around Rs 5 crore: NCB pic.twitter.com/EvCIMNlefy
— ANI (@ANI) August 8, 2022
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.