Video : तो कळवळला, सॉरी म्हणाला, तरी ऐकलं नाही! कोचिंग क्लासमधील शिक्षकाचं हडळकृत्य, भयंकर मारहाण कॅमेऱ्यात कैद

काठी ठेवून हाताने मुलाच्या कानशिलातही या शिक्षकाने लगावली. त्याने हा विद्यार्थी फरशीवर कोसळला.

Video : तो कळवळला, सॉरी म्हणाला, तरी ऐकलं नाही! कोचिंग क्लासमधील शिक्षकाचं हडळकृत्य, भयंकर मारहाण कॅमेऱ्यात कैद
धक्कादायक घटना
Follow us
| Updated on: Jul 05, 2022 | 11:21 AM

कोचिंग क्लासमध्ये एका विद्यार्थ्याला शिक्षकानं अमानुष (Coaching Class teacher beaten 5 year boy) मारहाण केली. ही मारहाण इतकी संतापजनक होती, की या घटनेचा व्हिडीओ (Bihar boy beaten Video) समोर आल्यानंतर गावातल्या लोकांनी कोचिंग क्लासमधील शिक्षकालाच नंतर बदडून काढला. कोचिंग क्लासमध्ये एका वर्गात हा शिक्षक इतर मुलांच्या देखत एका पाच वर्षांच्या चिमुरड्याला अमानुष मारहाण करताना कॅमेऱ्यात कैद झाला. शिक्षकाचे फटके खात असताना हा विद्यार्थी कळवळत होता. त्याच्या किंचाळणं काळीज पिळवटून टाकणारं होतं लाकडाच्या फळीने एकामागोमाग एक फटके या शिक्षकाने विद्यार्थ्याच्या पार्श्वभागावर लगावले. शिक्षकाच्या जोरदार प्रहारानं विद्यार्थी कळवळू लागला. रडू लागला. पण शिक्षकानं मारहाण करणं काही थांबवलं नाही. इतकाच काय, तर नंतर काठी ठेवून हाताने मुलाच्या कानशिलातही शिक्षकाने लगावली. त्याने हा विद्यार्थी फरशीवर कोसळला.

यानंतरही शिक्षक थांबला नाही. विद्यार्थ्याच्या पाठीतही शिक्षकाने बुक्के घातले. हा सगळा प्रकार वर्गातील मुलांच्या देखतच सुरु होता. तर वर्गाच्या दरवाजात उभ्या असलेल्या एकानं चोरुन ही संपूर्ण घटना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात (Mobile camera Video) कैद केली.

हा मुलगा बेशुद्ध होईपर्यंत शिक्षकाने त्याला जबर मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ नंतर व्हायरल झाला. त्यानंतर या कोचिंग क्लासमधील शिक्षकाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. शिक्षकाने केलेल्या या जबर मारहाणीत विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता. कसंबसं करुन विद्यार्थ्याने जीव वाचण्याच्या इराद्याने वर्गातून पळ काढला.

हे सुद्धा वाचा

Video : या घटनेचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

नेमकी कुठे घडली घटना?

ही धक्कादायक घटना बिहारमध्ये घडली. बिहारच्या पाटणामधील धनरुआ इथं ही भयंकर घटनी घडली होती. जया क्लासेसमध्ये शालेय विद्यार्थ्यांची आणि सैनिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणी दिली जाते. शनिवारी छोटू नावाच्या एका शिक्षकाला एका शुल्लक कारणावरुन राग आला. विद्यार्थ्यावर आलेला राग या शिक्षकानं इतक्या भयंकर पद्धतीनं व्यक्त केला, की वर्गातील सगळेच विद्यार्थी हादरुन गेले होते.

शिक्षकाला ग्रामस्थांची मारहाण

विद्यार्थ्याला मारहाण करणारा हा शिक्षक शॉर्ट टेम्पर्ट होता. त्यानं केलेलं कृत्य गावातील लोकांना कळल्यानंतर स्थानिकांनी या शिक्षकाला चोपून काढलं. यानंतर मारहाणी दरम्यान, कसाबसा पळ काढत या शिक्षकानं स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. अखेर आता याप्रकरणी पोलिसांतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून फरार शिक्षकाचा शोध घेतला जातोय. तर ज्या क्लासमध्ये हा शिक्षक शिकवत होता, तिथूनही त्याला काढून काढण्यात आलंय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.